बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचे फिटनेस ट्रेनर कैझाद कपाडिया यांचे बुधवारी (13 ऑक्टोबर) निधन झाले. त्यांच्या मृत्यूचं कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. कैझाद हे ‘K11 फिटनेस अकॅडमी ऑफ सायन्सेस’ मुंबईचे मालक होते. ते बॉलिवूडमधील अनेक मोठमोठ्या कलाकारांचे फिटनेस ट्रेनर होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हिंदी सिने जगतातून दुःख व्यक्त केले जात आहे.
अभिनेता टायगर श्रॉफने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन कैझाद यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ज्यामध्ये त्याने ‘रेस्ट इन पॉवर कैझाद सर’ असा भावूक संदेश लिहिला आहे. त्यासोबत टायगरने त्यांचा फोटो सुद्धा पोस्ट केला आहे.

टायगर श्रॉफ हा सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. आपल्या फिटनेस आणि वर्कआऊटबद्दल तो चाहत्यांना नेहमीच माहिती देत असतो. एक फिट आणि दमदार अभिनेता म्हणून टायगर श्रॉफची बॉलिवूडमध्ये ओळख आहे. टायगर नेहमी जिममध्ये वर्कआऊट करताना दिसून येतो. आपल्या फिटनेसच्या बाबतीत टायगर नेहमी दक्ष असतो, म्हणूनच तो कधीच त्याचा वर्कआऊट चुकवत नाही.
प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा असलेला टायगर श्रॉफ अभिनयात जास्त चमकला नसला, तरीही तो एक उत्कृष्ट डान्सर म्हणूनही ओळखला जातो. त्याचे ऍक्शन सीन पाहण्यासाठी चाहते खुप उत्सुक असतात.
दरम्यान टायगर श्रॉफ अभिनेत्री दिशा पटानी सोबतच्या संबंधामुळे ही सतत चर्चेत असतो. अनेक कार्यक्रमात, पर्यटनस्थळी दोघे सोबत फिरताना दिसून येतात. दोघांचे वर्कआऊट आणि डान्सचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत असतात. या दोघांनी मात्र अजून या चर्चेला अधिकृत दुजोरा दिला नाही. आम्ही फक्त चांगले मित्र असल्याचे, ते सांगतात. सध्या टायगर ‘हीरोपंती 2’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मोठी बातमी! ईडीकडून नोरा अन् जॅकलिनला समन्स; २०० कोटींच्या खंडणी प्रकरणी अभिनेत्रींची कसून चौकशी










