बॉलिवूडमध्ये स्टंट हिरो या नावाने ज्याची ओळख आहे, तो म्हणजे टायगर श्रॉफ. तो त्याच्या अभिनयासोबत त्याच्या डान्सने आणि स्टंटने सर्वत्र लोकप्रिय आहे. यासोबतच टायगर त्याच्या फिटनेसची देखील खूप काळजी घेत असतो. त्याचा फिटनेस बघून त्याचे चाहते नेहमीच त्याचे कौतुक करत असतात. तो नेहमीच त्याचे जिममध्ये व्यायाम करताना आणि स्टंट करताना फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. यामुळे तो नेहमीच लाईम लाईटमध्ये असतो. अशातच टायगर श्रॉफने त्याचा वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तो स्टंट करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टायगर हा एअर किक मारताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर त्याच्या चाहत्यांसोबत कलाकार देखील कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही. त्याच्या या व्हिडिओवर रोनित रॉय, राहुल देव, अरमान मलिक, रेमो डिसुझा, सोफी चौधरी, दिशा पटानीची बहीण खुशबू पटानी यांनी कमेंट केली आहे.
टायगर श्रॉफच्या या स्टंट व्हिडिओला आतापर्यंत सोशल मीडियावर 4 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर लाईक्सने 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. त्याचे चाहते तर त्याचे स्टंट पाहून त्याचे दीवाने झाले आहेत. सगळेजण त्याचे कौतुक करत आहे.
टायगर श्रॉफच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच त्याच्या ‘गणपत’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत क्रिती सेनन दिसणार आहे. क्रिती आणि टायगर हे दोघे या आधी ‘हिरोपंती’ या चित्रपट एकत्र दिसले होते. टायगर श्रॉफने त्याच्या ‘हिरोपंती 2’ या चित्रपटाची घोषणा देखील केली आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत तारा सुतारिया दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…










