Saturday, June 29, 2024

टेलिव्हिजनवरील संस्कारी सून झाली मॉर्डन, पाहा टिना दत्ताचे ग्लॅमरस फोटो

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘उतरण’ फेम टिना दत्ता तिच्या अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहचली आहे. मालिकेतील तिचे इच्छा हे नावाचे इतके गाजले की, अनेकांना ही गोष्ट माहीत देखील नसेल की, तिचे नाव टिना आहे. सगळेजण तिला इच्छा या नावाने ओळखतात. टेलिव्हिजनवर अत्यंत साधीभोळी, संस्कारी सुनेचे असे तिचे पात्र होते. त्यामुळे अनेक असे वाटते की, वैयक्तिक आयुष्यात देखील ती तेवढीच साधी आहे. परंतु टिना तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि हॉट आहे. सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक फोटो ती तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिच्या प्रोजेक्टसोबत टिना तिच्या स्टायलिश लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते. अशातच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. टेलिव्हिजनवरील आदर्श सुनेने असे काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत.

समोर आलेल्या फोटोमध्ये टिनाने पिवळ्या रंगाचा शर्ट आणि शॉर्ट्स घातले आहे. तसेच काळ्या रंगाची ब्रालेट घातली आहे. तिने या फोटोमध्ये शर्टचे बटन उघडे ठेवले आहे. तसेच न्यूड मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.

तिच्या या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. तिने डोळ्यांवर चश्मा देखील लावला आहे. तिचा हा लूक अनेकांना खूप आवडले आहेत. तिच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत.

टिना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो ती नेहमीच शेअर करत असते. या फोटोंमध्ये तिचा वेगवेगळा अंदाज पाहायला मिळत असतो. तिचे हे फोटो देखील सोशल मीडियावर सगळ्यांना आवडत आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा