Tuesday, July 9, 2024

‘बाँब स्क्वाड’ डान्स ग्रूपच्या तीन मुलींनी ‘टिप टिप बरसा पानी’वर केला जबरदस्त डान्स, तुमचेही थिरकतील पाय

सुपरस्टार अक्षय कुमारला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याचा कोणताही चित्रपट, गाणी प्रदर्शित होता क्षणीच धुमाकूळ घालतात. अशातच आता त्याचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने अवघ्या ५ दिवसात १०० कोटींपेक्षाही अधिक रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे सोशल मीडियावर सध्या चांगलेच चर्चेत आहे. खरं तर, हे गाणे सन १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ चित्रपटातील आहे. या गाण्याला आतापर्यंत अनेकदा रिमेक केले आहे. मात्र, दीर्घ काळानंतर हे गाणे पुन्हा एकदा अक्षय कुमारवरच चित्रीत करण्यात आले आहे.

या मुलींनी लावले अक्षय कुमारच्या गाण्यावर ठुमके
तसं पाहिलं, तर मूळ गाण्यात जिथे अक्षय कुमारसोबत अभिनेत्री रवीना टंडन होती. मात्र, आता नव्याने चित्रीत केलेल्या या गाण्यात कॅटरिना कैफ अक्षयसोबत दिसत आहे. दोघांच्याही या व्हायरल होत असलेल्या गाण्यावर काही मुलींनी केलेल्या डान्सचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत तीन मुली ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. (Tip Tip Barsa Paani Hot Dance By Girls Getting Viral On Internet After Actress Katrina Kaif Sooryavanshi Song)

परफॉर्मन्स पाहून लाखो चाहते झाले वेडे
‘बाँब स्क्वाड’ नावाच्या डान्स ग्रूपच्या या मुलींचा डान्स व्हिडिओ ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावरील आतापर्यंतचा सर्वात व्हायरल डान्स व्हिडिओ मानला जात आहे. अधिकृत गाण्याव्यतिरिक्त डान्स व्हिडिओचा विचार केला, तर या व्हिडिओला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आताच नाही, तर हे गाणे इंटरनेटवर बरेच दिवस व्हायरल होत आहे. मात्र, ‘सूर्यवंशी’चे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर आता त्याला पुन्हा एकदा जोर आला आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

मूळ गाण्यात रवीनाने मन जिंकले
पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून या मुली बोल्ड स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहेत. चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या लूक आणि स्टाईलचे कौतुक केले आहे. मूळ गाण्याबद्दल सांगायचे, तर रवीना टंडन पावसात नाचताना दिसली होती. या गाण्यात ती अक्षय कुमारला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसली होती.

सन २०१७ मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या त्यांच्या या व्हिडिओला आतापर्यंत ८९ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच शेकडो कमेंट्सचाही पाऊस पडला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करण जोहरने आलिया भट्टसोबत खेळला मजेदार रॅपिड फायर राऊंड, अभिनेत्रीनेही दिली धमाकेदार उत्तरे

-‘राधे श्याम’च्या दिग्दर्शकाविरोधात प्रभासच्या चाहत्याने लिहिली सुसाईड नोट, दिली मरण्याची धमकी

-द बिग पिक्चर शोच्या सेटवर लहान मुलांना पाठीवर बसून फिरवताना दिसला सलमान खान

हे देखील वाचा