Wednesday, July 3, 2024

छळ आणि दुसरे लग्न केल्याच्या आरोपाखाली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, पत्नीने केला होता गुन्हा दाखल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘निमकी मुखिया’मधील प्रमुख कलाकार तितर सिंग म्हणजेच विजय कुमार अडचणीत सापडले आहेत. त्यांना कौटुंबिक छळ आणि पहिली पत्नी असतानाही दुसरे लग्न केल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. या बातमीने मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 2020 मध्ये पटना पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीने प्राथमिक गुन्हा दाखल केला होता. या कारवाईनंतर विजय कुमार हे फरार झाले होते.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘निमकी मुखिया’मधील प्रमुख कलाकार विजय कुमार यांना पटनाच्या महिला पोलीस ठाण्याने अटक केली आहे. विजय कुमार यांच्यावर पहिली पत्नी असतानाही दुसरे लग्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अभिनेता विजय कुमार यांनी ‘निमकी मुखिया’ मालिकेत तितर सिंगची भूमिका साकारली होती. (titar Singh in nimki mukhiya arrested in patna while first wife married another girl)

तत्पूर्वी, पटना पोलिसांना विजय कुमार आपल्या नाटकाच्या टीमसोबत नौबतपूर येथे नाटक करत असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीवरून पटनाच्या महिला पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक बृजेश कुमार सिंग यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन विजय कुमार यांना अटक केली आहे. पोलिसांना बघून विजय कुमार यांनी पळायचा प्रयत्नही केला, परंतु त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही.

अटकेनंतर महिला पोलीस ठाण्यात विजय कुमार यांना चौकशीसाठी आणण्यात आले आहे. विजय कुमार यांच्यावर छळ आणि दुसरे लग्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2020 मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून विजय कुमार फरार होते.

दरम्यान, विजय कुमार यांना अटक करण्याची मागणी गेल्या वर्षी कालिदास रंगालयात एका कार्यक्रमात त्यांच्या पहिल्या पत्नीने तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्याकडे केली होती. याचबरोबर विजय कुमार यांच्या मुलानेही त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विजय कुमार यांच्या मुलाच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वडिलांनी आईला खूपच अभद्र वागणूक दिली आहे.

विजय कुमार यांच्या मुलाने आरोप केले आहेत की, नौबतपूरमधील सगळी संपत्ती विकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आईला खर्चायलाही पैसे देत नसल्याचाही त्याने आरोप केला आहे. खर्चायला पैसे देत नसल्याने शिकवणी घेऊन त्या दोन्ही मुलांना सांभाळत असल्याचा आरोपही त्यांच्या मुलाने केला आहे.

या बातमीने मनोरंजन क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भर गर्दीत ‘मन्नत’च्या बाहेर हनुमान चालीसाचा जप करताना दिसले पंडितजी, पाहा व्हिडिओ

-मोठी बातमी! आर्यन खान आर्थर रोड कारागृहातून बाहेर, लवकरच होणार मन्नतवर रवाना

-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

-काय सांगता! जामीन तर मिळणार, परंतु न्यायालयाने आर्यनसमोर ठेवल्या ‘या’ एकूण ११ अटी

हे देखील वाचा