Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘जेठालाल’ साकारण्यापूर्वी दिलीप जोशींनी ‘या’ चित्रपटात केलंय काम; प्रियांका चोप्राच्या चित्रपटाचाही आहे समावेश

टीव्हीवरील सर्वाधिक प्रसिद्ध ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोला नुकतीच १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या टीव्ही शोमध्ये एकापेक्षा एक निरनिराळे पात्र प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. असेच सर्वाधिक लोकप्रिय असणारे पात्र म्हणजे ‘जेठालाल’, जे अभिनेता दिलीप जोशी यांनी साकारले आहे. जेठालालच्या या व्यक्तिरेखेने दिलीप जोशी यांना घराघरात पोहचवले आहे. ‘जेठालाल’ अर्थातच दिलीप जोशी यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे, पण त्यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमधूनच लोकप्रियता मिळाली. 

पण तुम्हाला माहितीये का, की दिलीप जोशी यांनी प्रियांका चोप्रासोबत ‘व्हॉट्स योर राशी’ या चित्रपटात काम केले आहे. ‘व्हॉट्स योर राशी’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि हरमन बावेजा मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. तसेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचे टेलिकास्टिंग २००८ मध्ये सुरू झाले होते. माध्यमातील वृत्तानुसार, ‘व्हॉट्स योर राशी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. मात्र तरीही दिलीप जोशी यांच्या कामाचे बरेच कौतुक झाले होते. (taarak mehta ka ooltah chashmah dilip joshi had worked with priyanka chopra in a film)

तसेच तुम्हाला हे जाणून देखील आश्चर्य वाटेल की, दिलीप जोशी यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र ते तेव्हा इतके लोकप्रिय नव्हते, त्यामुळे प्रेक्षकांनी त्यांच्याकडे तितके लक्ष दिले नाही. सलमान खानचा ‘मैनें प्यार किया’, शाहरुख खानचा ‘फिर भी दिल हैं हिंदुस्तानी’, सोनू सूद आणि परेश रावलसह ‘धुंडते रेह जाओगे’ या चित्रपटांसह इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

हे देखील वाचा