Wednesday, July 3, 2024

‘तुमच्या जाण्याने कार्यक्रम बंद होणार नाही…’ शैलेश लोढा यांच्यावर पहिल्यांदाच साधला निशाणा

हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचे नाव घेतले जाते. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कार्यक्रमाची विनोदी मांडणी आणि कलाकारांचा अभिनय यामुळे हा कार्यक्रम  नेहमीच लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याचे दिसत आहे. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराशी प्रेक्षकांचे एक खास नाते आहे. परंतु अलिकडच्या काळात या कार्यक्रमातील अनेक कलाकरांनी मालिकेला रामराम ठोकल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली होती. याला मालिकेचे निर्माते  जबाबदार असल्याचेही बोलले जात होते. मात्र आता पहिल्यांदाच निर्मात्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय शोमध्ये समाविष्ट असलेला तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मात्र, यामध्ये चाहत्यांना खूश करण्याचे कारण नव्हते. अलीकडेच बातमी आली होती की, शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते  शैलेश लोढा आता मालिकेपासून वेगळे झाले आहेत.

जेव्हा निर्माते शैलेशचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या बातम्या येत होत्या, त्याच दरम्यान त्याच्या नवीन शो ‘वाह भाई वाह’चा प्रोमोही आला होता. मात्र या संपूर्ण प्रकरणावर निर्मात्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित कुमार मोदी यांनी कलाकारांनी शो सोडल्याबद्दल उघडपणे आपले मत व्यक्त केले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते एका  म्हणाले, “बघा, मी आधी म्हटल्याप्रमाणे, मला सर्वांना एकत्र ठेवायचे आहे. पण काही लोकांना एकत्र यायचे नसेल तर त्यांचे पोट भरले आहे. होय, त्यांना वाटते की आपण खूप काही केले आहे, आणि काहीतरी केले पाहिजे, देवाने आपल्याला खूप प्रतिभा दिली आहे, आपण फक्त तारक मेहता का उल्टा चष्मा एवढ्यापुरते मर्यादित नाही, त्यांना समजून घ्यायचे नाही, मी अजूनही सांगतो.  विचार करा आणि समजून घ्या. पण तुम्ही आला नाही तर नक्कीच, शो थांबणार नाही.”

दरम्यान, रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की शोमध्ये टप्पूची भूमिका साकारणारा राज अनडकट देखील शो सोडत आहे. यावर अद्याप राज किंवा निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु असित कुमार मोदींचा मूड निश्चित दिसत आहे की ते आपला करार अजिबात बदलणार नाहीत.

हेही वाचा –

बॉलिवूडची स्टाईलिश अभिनेत्री समिरा रेड्डी आता दिसते ‘अशी’, व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क

दिग्गज गायक किशोर कुमारांची कार्बन कॉपी आहेत अमित कुमार, फोटो पाहिला का?

तोबा तोबा! दोन नाड्यांनी सांभाळला अभिनेत्रीचा ड्रेस, ४ तासातच १ लाख लोकांनी पाडला लाईक्सचा पाऊस

हे देखील वाचा