बॉलिवूड कलाकारांचे खूप चाहते आहेत. ते चाहते त्यांना भेटण्यासाठी खूप आतुर असतात आणि काही करायला तयार असतात. अशीच एक घटना बॉलिवूडमधील हँडसम अभिनेता कार्तिक आर्यनबाबत घडली आहे. आपल्या चाहत्याची इच्छा पूर्ण करायला कार्तिक काय करू शकतो याचे ताजे उदाहरण आहे. असाच अभिनेत्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
मुंबई हे स्वप्नांच शहर आहे. अनेक लोक अनेक स्वप्न घेऊन या शहरात येतात. खूप लोक तर केवळ आपल्या आवडत्या अभिनेता -अभिनेत्रीला भेटण्यासाठी येतात. अशीच एक घटना कार्तिकसोबत घडली आहे. कार्तिकच्या दोन्ही मुली खूप मोठ्या चाहत्या आहेत. त्या चक्क कोलकत्ता ते मुंबई प्रवास करून फक्त कार्तिकला बघण्यासाठी आल्या. त्या कार्तिकच्या फ्लॅटखाली पोहोचल्या आणि मोठमोठ्यानी कार्तिकच्या नावाने ओरडून लागल्या. त्यानंतर जे खाली घडल ते बघून सगळेच थक्क झाले. या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कार्तिकचे बाकी अनेक चाहते या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. (to meet arayan khan two girls shouted the name of actor)
कार्तिकने हा प्रसंग आपल्या वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे आणि आपले चाहते आपल्यावर एवढं भरभरून प्रेम करत आहेत, त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानले. कोलकत्ता ते मुंबई प्रवास करून दोन मुली कार्तिकला भेटायला आल्या त्या कार्तिक राहत असलेल्या फ्लॅटच्या खाली येऊन “कार्तिक प्लिज बाहेर ये, ” म्हणून ओरडू लागल्या. यातून त्या कार्तिकच्या खूप मोठ्या चाहत्या आहेत हे दिसून येते.
हा व्हिडिओ शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “हे प्रेम, यासाठीच मी जगत आहे. हे माझ्यासाठी माझं यश आहे. माझं सगळं काही आहे. खरतर तुमच्या सगळ्यांमुळे मी धन्य झालो आहे. मी कधीही तुमचे पूर्णपणे आभार मानू शकत नाही. तरी देखील मी प्रयत्न करत राहील.”
त्याचाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात कार्तिक फ्लॅटच्या बाहेर आला आहे आणि त्याच्या त्या दोन चाहत्यांना भेटला आहे. यावेळी तो त्यांच्यासोबत फोटो काढतो तसेच त्यांचे आभार मानतो. त्याला पाहून त्या दोन मुलींना देखील खूप आनंद झाला. कार्तिक आर्यनला भेटून त्यांच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद साफ दिसत आहे.
हेही वाचा :
नशेत धुंद आर्यन खानने विमानतळावरच केली लघूशंका? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओतील सत्य
…म्हणून दीपिकाने केला तिच्या वाढदिवसाचा जंगी बेत रद्द, वाचून तुम्हीही म्हणाल, ‘अरे हे काय झालं’ ‘
मायरा वैकुळने ‘केळेवाली’ गाण्यावर केला असा डान्स की, सोनाली कुलकर्णीने देखील केली भन्नाट कमेंट