Tuesday, February 3, 2026
Home बॉलीवूड ‘बिग बीं’नी दिला जयांसोबतच्या ४९ वर्षांपूर्वीच्या आठवणीला उजाळा; फोटो शेअर करत म्हणाले…

‘बिग बीं’नी दिला जयांसोबतच्या ४९ वर्षांपूर्वीच्या आठवणीला उजाळा; फोटो शेअर करत म्हणाले…

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने अनेक दशके गाजवली आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने अनेकांसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांनी अनेकांना आपल्या अभिनयानेे प्रभावित केले आहे. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वासह अमिताभ बच्चन हे ‘कौन बनेगा करोडपती सीझन १३’होस्ट करत आहेत. त्यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. बऱ्याचदा त्यांच्या चाहत्यांसाठी ते त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. अलीकडेच त्यांनी जया बच्चन यांच्यासोबत ४९ वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर या फोटोवर श्वेता बच्चन नंदा आणि नात नव्या नवेली नंदाने प्रतिक्रिया दिली आहे.

अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या पोस्टमध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दलचे अनुभव चाहत्यांसोबत शेअर करतात. बिग बींनी अलीकडेच त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ते त्यांची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन लिहिले की, “आमचा पहिला चित्रपट एकत्र, ‘बन्सी और बिरजू …’ १ सप्टेंबर १९७० रोजी रिलीझ झाला … ४९ वर्षांपूर्वी.” (to the love of Big B 49 years ago memory, daughter and granddaughter reacted )

चाहते आणि कलाकार अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टला खूप पसंती देत ​​आहेत. त्याचबरोबर श्वेता बच्चनने तिच्या आई- वडिलांच्या फोटोवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. श्वेताने म्हणाली की, ‘तुम्हा दोघांना प्रेम.’ त्याचवेळी नात नव्याने हार्ट इमोजीद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या अमिताभ बच्चन हे ‘कौन बनेगा करोडपती १३’ या शोमध्ये दिसत आहेत. शोमध्ये ते स्पर्धकांसोबत प्रश्नोत्तरांसह मजा करताना दिसत आहे. त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर नुकताच त्यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यासोबत ते लवकरच ‘झुंड’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘मेदे’ आणि ‘गुड बाय’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय बिग बी ‘द इंटर्न’ चित्रपटातही दिसणार आहेत. जो हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात बिग बी आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ

-देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा