Thursday, March 26, 2026
Home बॉलीवूड एक वर्षापूर्वी ट्रेलर रिलीज होऊनही रखडली राजकुमार राव यांची फिल्म, आता होणार OTT वर दमदार एन्ट्री

एक वर्षापूर्वी ट्रेलर रिलीज होऊनही रखडली राजकुमार राव यांची फिल्म, आता होणार OTT वर दमदार एन्ट्री

राजकुमार राव हा बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेता आहे. तो नेहमीच त्याच्या उत्तम चित्रपटामुळे चर्चेत असतो. या अभिनेत्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि ते गाजले सुद्धा आहेत. राजकुमार राव यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात या अभिनेत्याने स्थान निर्माण केले आहे. तर तो सध्या त्याच्या एका नवीन चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा अभिनीत बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘टोस्टर’ आता येणार आहे.

राजकुमार राव (rao)आणि सान्या मल्होत्रा ​​यांचा ‘टोस्टर’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल अशी जोरदार चर्चा होती, पण आता निर्माते तो ओटीटीवर प्रदर्शित करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती राजकुमार रावची पत्नी, पत्रलेखा हिने केली असून, ती या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. तर फेब्रुवारी 2026 मध्ये, नेटफ्लिक्सने आपल्या आगामी प्रकल्पांची यादी प्रसिद्ध केली होती. तर त्यात ‘टोस्टर’चा समावेश करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. हा चित्रपट 15 एप्रिल रोजी थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेसोबत एक विशेष घोषणा व्हिडिओ शेअर करण्यात आला, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

हा चित्रपट राजकुमार रावची पत्नी, अभिनेत्री पत्रलेखासाठीही खूप खास आहे. ‘टोस्टर’ हा तिचा निर्मिती क्षेत्रातील पदार्पणाचा चित्रपट आहे. नेटफ्लिक्ससोबत या प्रवासाची सुरुवात करणे हा तिच्यासाठी एक मैलाचा दगड आहे. या चित्रपटात राजकुमार राव, सान्या मल्होत्रा, अर्चना पुरण सिंग, अभिषेक बॅनर्जी, फराह खान, उपेंद्र लिमये, विनोद रावत, जितेंद्र जोशी, सीमा यांसारखे अनुभवी कलाकार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘धुरंधर 2’ अवघ्या एका आठवड्यात केली 1000 कोटींची कमाई, 7 दिवसांत 7 मोठे विक्रम काढले मोडीत

हे देखील वाचा