Saturday, June 29, 2024

‘नॅशनल क्रश’ने केला वयाचा 27वा टप्पा पार, वाढदिवसाच्या खास शुभेच्छांसाठी चाहत्यांचे मानले आभार

टाॅलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आज म्हणजेच बुधवारी (दि. 5 एप्रिल)ला आपला 27वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त रश्मिकाला कलाकरांसह चाहते देखील भरभरुन शुभेच्छा देत आहे. अशात रश्मिकाने तिला मिळालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल, तिच्या इस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती चाहत्यांचे आभार मानत आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री रश्मिका मंदन्ना (rashmika mandanna) खुप सुंदर दिसत असून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानत आहे. अभिनेत्रीच्या व्हिडिओला अवघ्या काही वेळातच 4.5 लाख लाइक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर व्हिडिओवर सुमारे साडेदहा हजार कमेंट्स करण्यात आल्या आहेत. तिच्या वाढदिवसानिमित्त चाहते तिला ‘हॅपी बर्थडे ब्युटीफुल’ असे लिहून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

यावेळी रश्मिकाने सुंदर टी-शर्ट घातला आहे, तर केस माेकळे साेडले आहेत, ज्यामध्ये ती खुपच युनीक दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांच्या तब्येतीचीही विचारपूस केली आहे. यासाेबतच ती कॅमेऱ्याकडे पाहून हसतानाही दिसत आहे. रश्मिकाची ही स्टाइल तिच्या चाहत्यांना खूप आवडते. तिच्या वाढदिवसानिमित्त अनेक चाहत्यांनी तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

रश्मिका मंदान्ना ही एक चित्रपट अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटातून ती खूप प्रसिद्ध झाली. या चित्रपटात तिच्याशिवाय अल्लू अर्जुनही मुख्य भूमिकेत हाेता. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर तिचे अभिनंदन करणाऱ्यांचा ओघ सुरू आहे.

रश्मिका मंदान्ना नुकतीच IPL 2023 च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये देखील दिसली होती. यावेळी रश्मिका ‘नाटू- नाटू’ या गाण्यवर थिरलकली हाेती. रश्मिकाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. यामुळे तिला नॅशनल क्रश असेही म्हणतात.(tollywood actress rashmika mandanna turns 27 national crush thanks fans for birthday wishes in a special way through video)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पुष्पा 2’चा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी उघडणार रहस्य?

नमाज अदा केल्यामुळे राखी सावंत झाली ट्रोल; युजर्स संतापून म्हणाले, ‘पूर्ण कपडे घालं…’

हे देखील वाचा