Monday, July 1, 2024

नादच खुळा! अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ चित्रपटासाठी घेतले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये, किंमत वाचून सरकेल पायाखालची जमीन

आज प्रत्येक चित्रपटसृष्टीत आपल्याला एका सिनेमासाठी भरमसाठ मानधन घेणारे मोठ- मोठे कलाकार पाहायला मिळतात. यापैकीच एक म्हणजे सर्वांचा लाडका दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन होय. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची संख्या कोटींमध्ये आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी त्याचे चाहते आतुरलेले असतात. आता त्याचा नवीन चित्रपट ‘पुष्पा’ हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटासाठी अल्लूने घेतलेले मानधनही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या चित्रपटाच्या महत्त्वाच्या भागाची शूटिंग झाली आहे. नुकतेच माध्यमात वृत्त आले होते की, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनित ‘पुष्पा’ हा चित्रपट निर्माते दोन भागांमध्ये रिलीझ करणार आहेत. ज्यानंतर चाहत्यांची चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘पुष्पा’ चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने घेतले इतके मानधन
नुकतीच चित्रपटाबाबत एक चकित करणारी माहिती समोर आली आहे, ज्याचा संबंध अल्लू अर्जुनशी आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, अल्लू अर्जुन आपल्या या बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेतले आहे. झूमने दिलेल्या वृत्तानुसार, अल्लूने या चित्रपटासाठी तब्बल ५० कोटी रुपये मानधन घेतले आहे.

माध्यमांतील वृत्तांमध्ये असा दावा केला जात आहे की, अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ चित्रपटासाठी ५० कोटी रुपये इतके मानधन घेतले आहे. परंतु यावर अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अल्लू अर्जुनचे वडील आणि निर्माते अल्लू अरविंद यांचे मेहुणे मुत्तमशेट्टी हे या चित्रपटाचे सह निर्माते आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार हे आहेत.

या चित्रपटाचा टिझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी रिलीझ केला गेला होता. त्यानंतर सर्व चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. अशामध्ये अल्लू अर्जुनच्या मानधनाबाबत ऐकल्यानंतर चाहते अजूनच वेडे झाले आहेत. ‘पुष्पा’ चित्रपटात पुरस्कार विजेते अभिनेते फहाद फासिल मुख्य खलनायकाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट या वर्षी ऑगस्ट महिन्यात रिलीझ होण्याची शक्यता आहे.

अल्लू अर्जुनने दिली कोरोना व्हायरसला मात
नुकतेच अल्लू अर्जुनला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. याची माहिती त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून दिली होती. त्यानंतर त्याने स्वत:ला क्वारंटाईन केले होते. तब्बल १५ दिवस तो गृह विलगीकरणात होता. यानंतर त्याने आता कोरोना व्हायरसला मात दिली आहे. नुकतेच त्याचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तो कोरोनामुक्त झाल्यानतंर आपल्या मुलांना मिठी मारताना दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आयुष्यात मित्र कमी आणि ट्रोलर्सच जास्त भरले आहेत’, म्हणत शालूची आपल्याच फोटोवर कमेंट

-ईद मुबारक! ‘संजू बाबा’ने कुटुंबासोबत दुबईत साजरी केली ईद, पत्नी मान्यताने फोटो केले शेअर

-‘या गरीब मुलासोबत काय करतेय?’ बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर अनुराग कश्यपची मुलगी ट्रोल

हे देखील वाचा