Wednesday, July 3, 2024

ब्रेकिंग! साऊथ इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का, प्रसिद्ध दिग्दर्शकाने घेतला शेवटचा श्वास

मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते गोरंटला राजेंद्र प्रसाद (gorantla rajendra prasad)यांचे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते आणि दीर्घ आजाराशी झुंज देत होते. पण ७ जुलै रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गोरंटला यांनी दीर्घ आजारानंतर अखेरचा श्वास घेतला. गोरंटला राजेंद्र प्रसाद यांच्या निधनाच्या बातमीने टॉलीवूड इंडस्ट्रीतील स्टार्सना धक्का बसला आहे.

गोरंटला राजेंद्र प्रसाद यांनी १९६३ मध्ये ‘रामुडू भीमुडू’ या चित्रपटाद्वारे त्यांच्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी डी रामनायडू यांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली, जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यानंतर त्यांनी ‘माधवी पिक्चर्स’ सुरू केले आणि त्यानंतर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्याच्या हिट चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्याने ‘एएनआर’, ‘मंजुळा’, ‘दोराबाबू’, ‘लक्ष्मी’ असे अनेक चित्रपट दिले आहेत.

गौतम राजू यांच्या मृत्यूची बातमी गोरंटला राजेंद्र प्रसाद यांच्या एक दिवस आधी आली होती. ते दक्षिण चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध संपादक आहेत, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १००० हून अधिक चित्रपटांचे संपादन केले आहे. साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (allu arjun) अनेक चित्रपटांचे संपादनही त्यांनी केले. एवढेच नाही तर त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. साऊथ इंडस्ट्रीने अवघ्या दोन दिवसांत आपल्या दोन दिग्गज व्यक्तींना गमावले आहे, त्यामुळे या इंडस्ट्रीतील कलाकारांवरही शोककळा पसरली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

शमिता शेट्टीसोबतच्या ब्रेकअपदरम्यान राकेश बापटची पोस्ट चर्चेत; म्हणाला, ‘नक्की कोण कोणाला फसवतंय’

बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरलेल्या ‘या’ अभिनेत्रीने एक-दोन नव्हे तर केलंय तब्बल ४ वेळा लग्न

‘मला तुझ्याकडून काहीही नको…’ अभिनेता भरत जाधवने पंढरीच्या विठूरायाला घातली भावनिक साद

हे देखील वाचा