Friday, April 19, 2024

Year Ending 2021: ‘लुट गये’ ते ‘पानी-पानी’, ‘या’ गाण्यांनी घातला युट्यूबवर धुमाकूळ; मिळवले कोट्यवधी व्ह्यूज

भारतातील चित्रपट गाण्यांशिवाय अपूर्ण आहेत. इथे संगीताला प्रत्येक खूप महत्त्व आहे. प्रेक्षकांचा देखील गाणी ऐकण्याकडे मोठ्या प्रमाणात कल असतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील अनेक उत्तमोत्तम गाणी बनवली गेली, जी प्रेक्षकांना खूप आवडली. त्याचवेळी, गेल्या काही वर्षांत संगीत जगताचे ट्रेंड खूप बदलले आहेत. पुन्हा एकदा सिंगल्सचा ट्रेंड सुरू झाला आहे. २०२१ या वर्षीही अनेक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाले आहेत, ज्यांनी युट्यूबवर प्रचंड व्ह्यूज मिळवले आहेत. चला तर मग या टॉप ५ गाण्यांची यादी जाणून घेऊया.

लुट गये
गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) याने गायलेले ‘लुट गये’ पहिल्या क्रमांकावर आहे. काही मिनिटांच्या या गाण्यात एक सुंदर प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. ज्यात इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आणि युक्ती थरेजाने (Yukti Thareja) सुंदर काम केले आहे. हे गाणे १७ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदर्शित झाले. ज्याला युट्यूबवर १०० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

बारिश की जाये
बी प्राकच्या (B Praak) आवाजातील ‘बारिश की जाये’ हे गाणे नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि सुनंदा शर्मा (Sunanda Sharma) यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. गाण्यातील नवाजुद्दीनचा रोमँटिक अंदाज सर्वांनाच आवडला. हे गाणे २७ मार्च २०२१ रोजी प्रदर्शित झाले होते. ज्याला आतापर्यंत ४८ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

पानी-पानी
रॅपर बादशाहचे (Badshah) ‘पानी-पानी’ हे गाणे ९ जून २०२१ रोजी प्रदर्शित झाले. ज्याला ६४८ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यामध्ये बादशाहसोबत जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) दिसली होती. या गाण्यावर सोशल मीडियावर रिल्सचा पाऊस पडला आहे.

सैयां जी
यो यो हनी सिंगच्या (Honey Singh) ‘सैयां जी’ या गाण्याने युट्यूबवर धमाका केला. ज्यामध्ये त्याच्यासोबत नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) दिसली होती. २७ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला ४८९ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

फिलहाल २
अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि नुपूर सेननचे (Nupur Sanon) ‘फिलहाल’ गाणे हिट झाल्यानंतर ‘फिलहाल २’ आले.

ज्याला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. हे गाणे ६ जुलै रोजी प्रदर्शित झाले असून, ते आतापर्यंत ५३८ मिलियनहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा