सध्या चित्रपटक्षेत्रात सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपटांचीच चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटांच्या कथा आणि दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने हे चित्रपट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.यामुळेच प्रेक्षकही या चित्रपटांना जोरदार प्रतिसाद देत आहेत. प्रेक्षकांच्या याच आवडीमुळे यावर्षी पाच दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. कोणते आहेत ते चित्रपट चला जाणून घेऊ.
अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा चित्रपटाच्या यशाने सध्या सगळीकडेच दाक्षिणात्य कलाकारांच्या चित्रपटांची चर्चा होताना दिसत आहे. आता या वर्षीही राम चरण (Ram Charan), ज्युनिअर एनटीआर (Jr NTR), प्रभास (Prabhas), यश (Yash), आणि महेश बाबू (Mahesh Babu) या दिग्गज कलाकारांचे चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. पाहूया या चित्रपटांची यादी.
आरआरआर
एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ चित्रपटात अजय देवगण (Ajay Devgan), आलिया भट्ट (Alia Bhatt), ज्युनिअर एनटीआर अशा दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. हा बहुचर्चित चित्रपट २५ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
राधेश्याम
राधा कृष्णकुमार यांचा ‘राधेश्याम’ चित्रपटात प्रभास, पूजा हेगडे (Pooja Hegde) आणि भाग्यश्री अशा दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट १४ जानेवारीला प्रदर्शित झाला असून सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
केजीएफ २
अभिनेता यशच्या ‘केजीएफ’ चित्रपटाने सर्वत्र धुमाकुळ घातला होता. आता या चित्रपटाचा पुढचा भाग १४ एप्रिलला प्रदर्शित होणार असुन यामध्ये संजय दत्त (Sanjay Dutt), प्रकाश राज (Prakash Raj), यश आणि अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) काम केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे.
वलीमई
या वर्षी प्रदर्शित होणारा ‘वलिमई’ हा एक धमाकेदार एक्शन चित्रपट आहे. चित्रपटात अजित कुमारने (Ajit Kumar) प्रमुख भूमिका साकारली असून चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी केली आहे, तर एच विनोद दिग्दर्शक आहेत.
सरकारू वारी पाटा
सुपरस्टार महेश बाबूची भूमिका असलेला हा चित्रपट १२ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक परशुराम यांचा हा चित्रपट एक कॉमेडी एक्शन कथेवर आधारित आहे.
दरम्यान या दिग्गज कलाकारांच्या भूमिका असलेले हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने मोठी सध्या त्यांचे चाहते खूपच खुश दिसत आहेत.
हेही वाचा-