Tuesday, October 14, 2025
Home अन्य भारतीय नेत्यांवर आधारित चित्रपट, ज्यात पाहायला मिळेल खरे राजकारण

भारतीय नेत्यांवर आधारित चित्रपट, ज्यात पाहायला मिळेल खरे राजकारण

राकारणावर आधारित चित्रपट हे नेहमीच पाहण्यासारखे असतात. राजकीय घटनांवर किंवा राजकारण्यांच्या जीवनावर आधारित विविध चित्रपट आहेत. त्यातल्या काहींनी लक्ष वेधले, तर काहींना वादाचाही फटका बसला. त्यातलेच हे आहेत काही चित्रपट

ठाकरे
अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘ठाकरे’ हा चित्रपट दिवंगत शिवसेना संस्थापक बाळ ठाकरे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अमृता राव मुख्य भूमिकेत आहेत. ठाकरे यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आणि त्यांनी मिळवलेले यश या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. याला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, जिथे बहुसंख्यांनी चांगली प्रतिक्रिया दिल्या नाहीत. असे असले तरी, सिद्दीकी यांच्या माजी शिवसेनाप्रमुखांच्या सशक्त चित्रणाचे चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले.

थलाइवी
अभिनेत्री कंगना रणौतने 2021 मध्ये आलेल्या ‘थलाइवी’ चित्रपटात दिवंगत अभिनेत्री-राजकारणी जयललिता यांची भूमिका साकारली होती. तमिळ, हिंदी आणि तेलगूमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन एएल विजय यांनी केले आहे. भारतीय राजकारणातील अभिनेत्री, राजकारणी आणि महिला आदर्श म्हणून जयललिता यांच आयुष्य चित्रपटात मांडण्यात आल आहे. त्यांनी एकूण 14 वर्षे सहा वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले, ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे.

द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर
विजय रत्नाकर गुट्टे दिग्दर्शित ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा बायोपिक आहे. अनुपम खेर आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान म्हणून सिंग यांचा 10 वर्षांचा दीर्घ प्रवास यात दाखवण्यात आला. मात्र, रिलीज होण्यापूर्वी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘खान असता तर लगेच…’, एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्यावर भडकले दिग्दर्शक
‘या’ सुपरस्टारला हॉस्पिटलमध्ये साजरा करावा लागला वाढदिवस; मेडिकल स्टाफसोबतचा फोटो शेअर करत दिली अपडेट

हे देखील वाचा