Saturday, July 6, 2024

असे ५ चित्रपट जे खूप हिट झाले, पण सिक्वेलने मात्र निराश केले

बॉलिवूडमध्ये तसं चित्रपटांचे सिक्वेल येणं नवी गोष्ट नाही, अगदी मोठमोठ्या दिग्जर्शक आणि प्रोड्यूसरनेही सिक्वेल चित्रपट आणले. आता सिक्वेल म्हणजे काय तर एखाद्या चित्रपटाचा पुढील भाग येणे. त्यात मग एकतर चित्रपटाच्या कथेला धरूनच सिक्वेलमधील कथा पुढे जाते किंवा भूतकाळ दाखवला जातो. किंवा त्याच रिलेटेड कथा पुढे जाते. किंवा पूर्णपणे कथा वेगळी असते. आशाप्रकारचे अनेक सिक्वेल सिनेमे बॉलिवूडमध्ये येऊन गेले. पण यातील अनेक सिक्वेल फ्लॉप झाले. कोणते होते ते चित्रपट आणि त्यांचे सिक्वेल जाणून घेऊया…

तर विषयाला सुरुवात करू. वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई हा चित्रपट चांगलाच हिट झाला होता. अजय देवगण, इम्रान हाश्मी यांची प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाचे कौतुकही बऱ्याच जणांकडून झाले, पण त्याच्या सिक्वेलने मात्र चाहत्यांना नाराज केले. वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा या नावाने आलेल्या सिक्वेलमध्ये अक्षय कुमार इम्रान खान सोनाक्षी सिन्हा दिसले होते. पण हा सिक्वेल छाप पाडण्यात अपयशी ठरला.

कोई मिल गया, क्रिश या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. कोई मिल गया मधील जादू, क्रिशचं मास्क हे या चित्रपटांतील आकर्षण ठरले होते. सायन्स-फिक्शनवर आधारीत असलेले हे चित्रपट आहे. क्रिश हा कोई मिल गयाचाच पहिला सिक्वेल. पण त्यानंतर याच सिरिजमधील तिसरा चित्रपट आला क्रिश ३. क्रिश ३ या चित्रपटाने मात्र प्रेक्षकांना नाराज केलं. हा चित्रपट अन्य सुपर हिरोंच्या चित्रपटांसारखाच असल्याने त्यात नाविण्य दिसलं नाही, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.

सडक हा १९९१ साली आलेला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्या चित्रपटात संजय दत्त आणि पुजा भट्ट यांच्या जोडीचेही कौतुक झाले. महेश भट्ट यांच्या या चित्रपटाचा सिक्वेल त्यांनी करायचा ठरवाला. त्याप्रमाणे २०२० मध्ये सडक २ चित्रपट रिलीज झाला. मात्र हा सिक्वेल प्रेक्षकांना भावला नाही. या चित्रपटात संजय दत्त, आलिया भट्ट आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. अनेक प्रेक्षकांच्या मते आलिया भटने काम केलेल्या चित्रपटांपैकी हा सर्वात फ्लॉप चित्रपट होता.

आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या पहिल्या मोठ्या चित्रपटासाठी करण जोहरचा स्टुडंट ऑफ द इयर चित्रपट सर्वांच्यात लक्षात राहिला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रेम मिळाले होते. पण याच चित्रपटाचा सिक्वेल २०१९मध्ये स्टुडंट ऑफ द इयर २ या नावाने आला. सिक्वेलचे दिग्दर्शन पुनील मल्होत्राने केले होते. पण या सिक्वेलने चाहत्यांना चांगलेच नाराज केले होते. सिक्वेलमध्ये टायगर श्रॉफ, अनन्या पांडे, तारा सुतारिया हे मुख्य भुमिकेत होते.

सनी देओलचा चित्रपट म्हणजे ऍक्शनतर असणारच. असाच १९९० मध्ये त्याचा एक ऍक्शन चित्रपट आला होता. ज्याचं नाव होतं घायल. या चित्रपटाने चांगले यश मिळवले होते. या चित्रपटातील अॅक्टर्सच्या अभिनयाचंही कौतुक झालेलं. या चित्रपटाचा सिक्वेल २०१६ साली आला. घायल वन्स अगेन या नावाने आलेल्या सिक्वेन्सचं दिग्दर्शन आणि स्टोरी सनी देओलचीच होती. त्यानं सिक्वेलमध्येही काम केलं. मात्र सिक्वेलला तेवढं यश मिळालं नाही आणि हा चित्रपट चांगलाच फ्लॉप ठरला.

इथे पाहा संपूर्ण व्हिडिओ: हिट चित्रपटांचे फ्लॉप ठरलेले सिक्वेल | Flop Sequel Movies | Krish 3 | Sadak 2

हे देखील वाचा