कन्नड सुपरस्टार यश आज, 8 जानेवारी 2025 रोजी, आपला 40वा वाढदिवस साजरा करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही चाहत्यांना यशकडून फॅन मीटची अपेक्षा होती. मात्र, यशने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांना कळवले की यावर्षी ते वाढदिवसानिमित्त त्यांना भेटू शकणार नाहीत. यामागचं कारण म्हणजे त्यांचा आगामी चित्रपट ‘टॉक्सिक’, ज्यामध्ये ते सध्या पूर्णपणे व्यस्त आहेत. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. यासोबतच यशने आपल्या चाहत्यांना एक खास वचनही दिलं आहे.
यशने (Yash)शेअर केलेल्या नोटमध्ये म्हटलं आहे – “माझ्या प्रिय चाहत्यांनो, मला माहीत आहे की गेल्या काही वर्षांपासून तुम्ही माझी भेट होण्याची वाट पाहत आहात. विश्वास ठेवा, मीसुद्धा तुमच्याशी भेटण्यासाठी तितकाच उत्सुक आहे. खरं तर यावर्षी वाढदिवशी तुमच्याशी भेटायची माझी खूप इच्छा होती. पण सध्या मी चित्रपट पूर्ण करण्यामध्ये पूर्णपणे गुंतलेलो आहे, जेणेकरून तुम्ही तो 19 मार्च 2026 रोजी मोठ्या पडद्यावर पाहू शकाल. त्यामुळे सध्या मी तुमची प्रत्यक्ष भेट घेऊ शकणार नाही.”
याच नोटमध्ये यश पुढे म्हणतो – “जरी सध्या आपण भेटू शकत नसलो, तरी मी वचन देतो की याची भरपाई नक्की करेन. आपण लवकरच एका मोठ्या इव्हेंटमध्ये भेटू. तोपर्यंत, तुम्ही दिलेल्या प्रत्येक शुभेच्छा मी स्वतः पाहीन आणि तुमचं प्रेम मनात साठवून ठेवीन.– तुमचा यश”
दरम्यान, यशच्या वाढदिवसानिमित्त ‘टॉक्सिक’चा एक खास एसेट (टीझर/अपडेट) रिलीज करण्याची योजना निर्मात्यांनी आखली आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे. प्रोडक्शन हाऊसने ट्विट करत म्हटलं—
“ज्याबद्दल त्यांनी तुम्हाला आधीच इशारा दिला होता, त्याचा खुलासा करत आहोत.
08-01-2026 | सकाळी 10:10 वाजता.” करु
‘टॉक्सिक’ हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, यश सुमारे चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘KGF 2’ (2022) होता.
‘टॉक्सिक’मध्ये यशसोबतच नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










