बराच काळ चर्चेत असलेल्या यशच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘टॉक्सिक’च्या (Toxic)निर्मात्यांनी अखेर चाहत्यांना मोठा सरप्राइज दिला आहे. यशच्या 40व्या वाढदिवसानिमित्त चित्रपटातील डार्क आणि हिंसक जगाची पहिली झलक समोर आली असून, या टीझरने सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवली आहे. टीझरमध्ये यशचा अत्यंत धोकादायक, बेधडक आणि रहस्यमय अवतार पाहायला मिळतो, जो प्रेक्षकांना एका क्रूर आणि रक्तरंजित विश्वात घेऊन जातो. टीझरला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, विशेषतः यशच्या अॅटिट्यूडची जोरदार चर्चा होत आहे.
गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये यशच्या ‘राया’ या भूमिकेची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. टीझर शेअर करताना मेकर्सनी कॅप्शनमध्ये लिहिले, “तुमचा धोका नीट पाहा – सादर आहे RAYA…” या ओळीवरूनच चित्रपट किती डार्क आणि इंटेन्सha असणार आहे, याचा अंदाज येतो.
टीझरची सुरुवात एका अंत्यसंस्काराच्या दृश्याने होते. शोकाकुल कुटुंब घाईघाईने स्मशानभूमी सोडताना दिसते. त्यानंतर तिथे एक कार येऊन थांबते आणि कथा अधिक रहस्यमय वळण घेते. कॅमेरा कारमधील एक बोल्ड आणि इंटिमेट क्षण दाखवतो, जो प्रेक्षकांना चकित करतो. पुढे यश कारमधून बाहेर येतो. तो सुरुवातीला शर्टलेस दिसतो आणि नंतर ब्लॅक ओव्हरकोट घालतो, जो त्याच्या रफ आणि खतरनाक व्यक्तिमत्त्वाला अधिक ठळक करतो.
धुक्यात सिगार ओढत असलेला यश अत्यंत स्टायलिश आणि प्रभावी दिसतो. पुढे तो निर्दयपणे बंदूक चालवत अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांवर गोळ्या झाडतो. टीझरमधील सर्वात दमदार क्षण तेव्हा येतो, जेव्हा यश थंडपणे म्हणतो, “डॅडी घरी आले आहेत.” हा डायलॉग चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही. टीझर रिलीज होताच अनेकांनी याला “प्युअर हॉलीवूड व्हाइब्स” असे म्हटले, तर काहींनी “सँडलवूडमधून हॉलीवूड लेव्हल फील” अशी प्रतिक्रिया दिली. यशचा स्टाइल, पार्श्वसंगीत आणि सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक होत आहे.
‘टॉक्सिक’ हा एक पीरियड गँगस्टर चित्रपट असून, तो KVN प्रोडक्शन्स आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. चित्रपटाची निर्मिती वेंकट के. नारायण आणि यश यांनी केली असून, कथा गीतू मोहनदास आणि यश यांनी संयुक्तपणे लिहिली आहे.
या चित्रपटात यशसोबत नयनतारा, कियारा आडवाणी, तारा सुतारिया, हुमा कुरेशी, अक्षय ओबेरॉय आणि सुदेव नायर यांसारखे मोठे कलाकार दिसणार आहेत. तसेच रुक्मिणी वसंत ‘मेलिसा’ या महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. डार्क थीम, दमदार पात्रे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सादरीकरणासह ‘टॉक्सिक’ 19 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टीझर पाहता, हा चित्रपट यशच्या करिअरमधील सर्वात चर्चित चित्रपटांपैकी एक ठरणार, हे नक्की एकूणच, ‘टॉक्सिक’चा टीझर यशच्या चाहत्यांसाठी मोठी मेजवानी ठरला असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










