Monday, July 8, 2024

हत्या की आत्महत्या? हॉलिवूड अभिनेता मोसेस जे मूसलेचा मृतदेह पाहता पोलिसही संभ्रमात

हॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. वॉकिंग डेड अभिनेता मोसेस जे मूसलेचे (Moses J Mooseley) निधन झाले आहे. अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये आणि हितचिंतकांमध्ये शोककळा पसरली आहे. प्रचंड फॅन फॉलोविंग असलेला हॉलिवूड अभिनेता मोसेसच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच दुःख झाले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. जॉर्जियातील स्टॉकब्रिजमध्ये त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या कुटुंबीयांनी अभिनेता हरवल्याची तक्रारही दाखल केली होती.

तक्रारीनंतर अभिनेत्याची कार ट्रॅक केली असता त्याचा मृतदेह सापडला. माध्यमांतील वृत्तानुसार, त्याच्या शरीरावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मात्र, ही हत्या की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत मृत्यूचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.

मोसेस (Moses J Mooseley) केवळ ३१ वर्षांचा होता. अभिनेत्याच्या निधनाबद्दल हॉलिवूड मीडियाशी बोलताना त्याच्या व्यवस्थापकाने सांगितले की, “हा अभिनेता खूप प्रतिभावान होता. तो काम आणि आयुष्याबद्दल खूप उत्सुक होता. तो मैत्री खूप छान जपायचा पण आता तो आमच्यात नाही.” अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर येताच, त्याचे मित्र आणि चाहते सोशल मीडियावर सतत शोक व्यक्त करत आहेत आणि त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

मोसेसने २०१० मध्ये मॉडेलिंग आणि अभिनयातून आपल्या करिअरची सुरुवात केली. हा अभिनेता ‘द हंगर गेम्स: कॅचिंग फायर’, ‘द इंटर्नशिप’ आणि ‘जॉयफुल नॉइज’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला होता. मात्र, २०१२ मध्ये त्याने एएमसीच्या ‘द वॉकिंग डेड’ मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांमध्ये एक खास स्थान निर्माण केले. २०१७ च्या ‘अटॅक ऑफ द सदर्न फ्राइड झोम्बीज’ या चित्रपटातील त्याचा जबरदस्त अभिनय चर्चेत होता. अर्थात, हा अभिनेता आता सर्वांमध्ये नाही, पण त्याच्या चाहत्यांना त्याला ‘हँक ‘ आणि ‘आरोही’ या चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा