Saturday, March 2, 2024

रोड हाऊसचा ट्रेलर रिलीज,जोरदार ऍक्शनसोबत कोनोर मॅकग्रेगरशी संघर्ष करताना दिसला जेक गिलेनहाल

1989 च्या क्लासिक ‘रोड हाऊस’ चा रिमेक चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. 25 जानेवारीला ‘रोड हाऊस’ चा जबरदस्त ऍक्शन असलेला ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात जेक गिलेनहाल हा सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता 1989ला बार ब्राॅल्स च्या मिस्टर राॅजर्सच्या रुपात दिसणार आहे. जेक गिलनहालने एका माजी-युएफसी मिडलवेट फायटर एलवुड डाल्टन ची भुमिका साकारली आहे.

1989 ला प्रदर्शित झालेला मूळ ‘रोड हाऊस’ त्याच्या साधेपणामुळे आणि केबलवरील सर्वव्यापकतेमुळे एक क्लासिक चित्रपट बनला होता. 2024मध्ये 1989 च्या क्लासिक ‘रोड हाऊस’चा रिमेक येणार आहे. हा रिमेकही तितकाच आशादायी दिसत वाटतोय. नवीन रोड हाऊस त्याच्या जुन्या व्हर्जनपेक्षा काही वेगळा असणार आहे, हे वेगळेपण आहे यातील कलाकारांच्या विविधतेमध्ये, ज्यामध्ये युएफसी फायटर कोनोर मॅकग्रेगर(UFC fighter Conor McGregor), त्याचसोबत चित्रपटात मिसुरीऐवजी फ्लोरिडा यांचा समवेश आहे. पण इतर घटक मात्र आधी होते तसेच राहणार आहेत, जसं की या चित्रपटाचा मुख्य हिरो एलवुड डाल्टन (जेक गिलेनहाल) त्याच्या भूतकाळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत बाउंसर म्हणून पुढे वाट शोधताना दिसतो.

चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज
चित्रपटात जेक गिलेनहाल एलवुड डाल्टनचं पात्र साकारत आहे. तो(Jake Gyllenhaal) एक माजी-युएफसी मिडलवेट फायटर आहे. जेक गिलेनहाल कोनोर मॅकग्रेगरशी संघर्ष करताना दिसत आहे. त्याचसोबत तो त्याच्या भुतकाळात घडलेल्या गोष्टींशी लढताना दिसत आहे.  तो त्याच्या भुतकाळात घडलेल्या काही गोष्टींमुळे शारिरीकदृष्ट्या बरा होण्यास असमर्थ आहे. अभिनेता त्याच्याच कारमध्ये वास्तव्य करताना दिसतो त्याचसोबत तो अंडरग्राउंड रिंग फाइटमध्ये भाग घेताना दिसतो. तो जेसिका विलियम्स च्या बार मालकाला भेटतो, जी त्याला तिच्यासाठी काम करण्यासाठी बोलावते. ऍक्शन फिल्मचं वेड असणाऱ्या प्रेक्षकांना हा चित्रपट(Road House) प्रचंड आवडणार यात काही वादंच नाही. कारण ट्रेलरवरून दिसुन येतंय की या चित्रपटात जबरदस्त फाइटिंग सीनस दिसणार आहेत. त्यासोबतंच सिनेमात जेक गिलेनहालचा अंदाज काहीसा काॅमेडी देखील आहे.

कधी रिलीज होणार रोड हाऊस
त्यामुळे आता ट्रेलर पाहिल्यावर बऱ्याच चाहत्यांच लक्ष वेधलं आहे ते या चित्रपटाच्या रिलीज डेटने. या सिनेमाच्या ट्रेलरसोबतंच रिलीज डेटही समोर आली आहे. रोड हाऊस हा चित्रपट 31 मार्चला ओटीटी प्लॅटफाॅर्मवर रिलीज होणार आहे. ऍमेझाॅन प्राइम या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर येणार असुन त्याचा ट्रेलरही ऍमेझाॅन प्राइमच्या ऑफिशिअल अकाउंटवरुनच रिलीज झाला होता.

रोड हाऊसचे दिग्दर्शिक डग लिमन(Doug Liman) यांनी याआधी मिस्टर अँड मिसेस स्मिथ, स्विंगर्स, अमेरिकन मेड, द बॉर्न आयडेंटिटी आणि एज ऑफ टुमॉरोचे दिग्दर्शन केले आहे. नवीन रोड हाऊस आधीसारख्याच जबरदस्त आणि नॉनस्टॉप ऍक्शनचे आश्वासन देतो.

हे देखील वाचा