बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी तिच्या मनमोहक आणि सुंदर अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडते. चाहत्यांना तिचे सौंदर्य आवडत असले, तरी तिचे डान्स व्हिडिओ सर्वाधिक पसंत केले जातात. गौहर खान तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे अनेकदा चर्चेत असते. पुन्हा एकदा तिचा लेटेस्ट व्हिडिओ चाहत्यांची झोप उडवत आहे. नेहमीप्रमाणेच गौहर तिच्या या व्हिडिओमध्येही कमालीची सुंदर दिसत आहे. या डान्सिंग व्हिडिओमध्ये गौहरचा डान्स आणि तिच्या सौंदर्याचा जबरदस्त मिलाफ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये गौहरचा वेस्टर्न आणि इंडियन असा दोन्ही लूक एकत्र पाहायला मिळत आहे.
गौहरचे सौंदर्य असो, ड्रेसिंग सेन्स असो किंवा डान्स आयटम नंबर असो किंवा सोशल मीडियावरील तिचे स्टायलिश फोटो चाहत्यांमध्ये नेहमीच त्यांना पसंती मिळते. केवळ चित्रपटांमध्येच नाही, तर सोशल मीडियावरही गौहरचे डान्स व्हिडिओ धूमाकूळ घालत असतात. सध्या गौहरचा लेटेस्ट डान्स व्हिडिओ चाहत्यांची मने जिंकत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये गौहरचा पाश्चिमात्य आणि पारंपारिक अवतार पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये गौहर ‘कोई शहरी बाबू दिल लहरी बाबू’ गाताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला तिने वन पीस परिधान केलेला दिसत आहे आणि काही सेकंदांनंतर अतिशय सुंदर साडी परिधान केलेली गौहर गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे गौहर तिच्या दोन्ही लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे.
‘कोणता लूक चांगला आहे, भारतीय की वेस्टर्न’
गौहरचे सौंदर्य अप्रतिम आहे. चाहत्यांना जितका गौहरचा वेस्टर्न लूक आवडतो, तितकाच त्यांना तिचा भारतीय लूकही आवडतो. मात्र, हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच गौहर खानने तिच्या चाहत्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की, त्यांना तिचा भारतीय लूक जास्त आवडतो की वेस्टर्न. प्रतिक्रिया देताना चाहत्यांनी कमेंट बॉक्सवर गौहरच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. तिच्या या व्हिडिओला १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
एका चाहत्याने लिहिले की, “तू सुपर टॅलेंटेड आहेस आणि प्रत्येक पोशाखात खूप सुंदर आणि सुंदर दिसतेस.” तर दुसर्या चाहत्याने लिहिले की, “ड्रेस कोणताही असो, तो तुला सुंदर दिसतोच.” त्याचबरोबर अभिनेत्री ईशा अग्रवाल आणि दिव्या अग्रवाल यांनीही कमेंट बॉक्समध्ये गौहरच्या सौंदर्याचे आणि डान्सचे कौतुक केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा
-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ
-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल