अभिनेत्री राजश्री देशपांडे सध्या तिच्या ‘ट्रायल बाय फायर’ या वेबसिरीजमुळे खूपच चर्चेत आली आहे. दिल्लीमधील ‘उपहार’ सिनेमाच्या कांडावर आधारित ही नेटफ्लिक्सची सिरीज नुकतीच प्रदर्शित झाली. या सिरीजमध्ये अभिनेत्री राजश्री देशपांडेच्या अभिनयाचे खूप कौतुक केले जात आहे. या सिरीजसाठी राजश्रीने अनेक गोष्टींमध्ये बदल केले. ही भूमिका खरी वाटावी यासाठी तिने खूप प्रयत्न केले आहे. सिरीजसाठी तिने चक्क १६ किलो वजन वाढवले होते. एका मुलाखतीमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
‘ट्रायल बाय फायर’ ही सिरीज एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. १९९७ साली दिल्ली येथील उपहार सिनेमाला आग लागली आणि या आगीत अनेक लोकांनी त्यांचे प्राण गमावले. फायर सेफ्टी नसल्यामुळे या आगीतून लोकांना वाचणे निव्वळ अशक्य झाले होते. या आगीत दोन मुलांचा मृत्यू होतो. त्यांच्या आईवडिलांनी नीलम आणि शेखर कृष्णमूर्ती यांनी न्याय मिळवण्यासाठी तब्ब्ल २० वर्ष कोर्टात चकरा मारल्या. राजश्री देशपांडे आणि अभय देओल यांनी त्याच आईवडिलांची भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
राजश्रीने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “या सिरीजसाठी मला खूप तयारी करावी लागली. राजश्री बनून मला या सिरीजमध्ये नव्हते राहायचे. मला नीलम व्हायचे होते. या भूमिकेसोबत न्याय करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. मला नीलम सारखा विचार करायचा होता. मी अशी भूमिका साकारत होते, जिने २० वर्ष लढाई लढली होती. मी हि अशी भूमिका साकारली जी खूपच मजबूत होती, याचा मला खूप अभिमान आहे.”
पुढे राजश्री म्हणाली, “नीलमसाठी तिच्या जीवनातील ही २० वर्ष केवळ आव्हानच होती. जेव्हा मी सिरीजची शूटिंग सुरु झाली तेव्हा माझे वजन ५० किलो होते. शुटिंग संपत आले तेव्हा माझे वजन ६६ किलो होते. मला वजन वाढवावे लागले. कारण मला ही भूमिका वेगळ्या पद्धतीने दाखवयाची होती. यात २० वर्षांचा प्रवास होता. जेव्हा तुमचे वय वाढते, तेव्हा तुमच्यात शारीरिक अनेक बदल घडतात. हे बदल दिसणे खूप गरजेचे होते. माझ्याकडे वजन वाढवण्यासाठी खूपच कमी वेळ होता. मी खूप अनहेल्दी खाऊन माझे वजन वाढवले जे चुकीचे आहे. मात्र काम मिळाले होते, ते मला हातातून जाऊ द्यायचे नव्हते. मला स्वतःला एवढे तयार करायचे होते की, मला बघताच दिग्दर्शकाने म्हणावे मला नीलम मिळाली.”
तत्पूर्वी राजश्रीने सीरिजच्या प्रदर्शनाआधी नीलम कृष्णमूर्ती यांची दिल्लीमध्ये भेट घेतली होती. त्यांनी तिला भेटल्यावर सांगितले की त्यांना ही सिरीज खूप आवडली. राजश्रीसाठी त्या रियल लाईफ हिरोज आहे. राजश्रीने ‘ट्रायल बाय फायर’आधी ‘एंग्री इंडियन गॉडेस’, ‘सेक्सी दुर्गा’, ‘सेक्रेड गेम्स’ आदी अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हंसिका मोटवानीच्या लग्नावर येतोय नवीन शो, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
आरोह वेलणकरने पोस्ट शेअर करत बिग बॉसमधल्या ‘त्या’ अनुभवांबद्दल व्यक्त केल्या भावना