Thursday, June 12, 2025
Home बॉलीवूड अभिनेत्री नुसरत जहाँ रुग्णालयात दाखल; लवकरच होणार आई

अभिनेत्री नुसरत जहाँ रुग्णालयात दाखल; लवकरच होणार आई

बंगालच्या तृणमूल काँग्रेसची खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँच्या घरी नव्या पाहूण्याचे अगमण होणार आहे. नुसरतला नुकतेच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. नुसरत आता नक्की मुलाला की मुलीला जन्म देणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. नुसरत जहाँच्या प्रसूतीची तारीख ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीची दिली होती, परंतु पण त्रास होत असल्याने तिला बुधवारी (२५ ऑगस्ट) एका खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले.

नुसरत जहाँने वर्ष २०१९मध्ये प्रसिद्ध व्यावसायिक निखिल जैन याच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न केले. हा विवाह तुर्कीमध्ये पार पडला. यानंतर, दोघांनी कोलकाता येथे एका रिसेप्शनचे नियोजन केले होते. ज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह बंगाली चित्रपट उद्योगातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही. २०२० मध्ये निखिल आणि नुसरतच्या नात्याबद्दल तिने स्वत:च खुलासा केला. तिचे लग्न तुर्कीच्या कायद्यानुसार त्यांचा विवाह मंजूर नव्हता.

यावर्षी बंगाली अभिनेता यश दासगुप्ता आणि नुसरतच्या विषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, जेव्हा नुसरत जहाँच्या गरोदरपणाची बातमी समोर आली, तेव्हा निखिल जैनने त्याबाबत प्रश्न उपस्थित केले. निखिलने या गर्भधारणेपासून स्वतः दूर राहून नुसरतबद्दल मोठे वक्तव्य केले होते. त्यांच्या लग्नातील वादादरम्यान, जैनने म्हटले होते की, “तो आणि नुसरत जहाँ नोव्हेंबर २०२०मध्ये या नात्यातून विभक्त झाले आहेत आणि त्यांनी विवाह रद्द करण्यासाठी अर्जही दाखल केला होता.”

त्याचवेळी, नुसरत जहाँ म्हणाली होते की, “आम्ही दोघांनी तुर्की विवाह नियमन अंतर्गत लग्न केले होते आणि आंतरधर्मीय संघ विशेष विवाह कायद्यानुसार भारतात या लग्नाची नोंदणी केली नाही, त्यामुळे हे लग्न वैध नाही.”

एवढेच नाही, तर नुसरतने खात्यातून पैशांची हेराफेरी केल्याचा आरोपही निखिल जैनवर केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

हे देखील वाचा