Monday, February 24, 2025
Home मराठी अभिनेत्री-खासदार नुसरत जहाँनी केलं वादग्रस्त वक्तव्य, भाजपची तुलना केली ‘या’ जिवघेण्या व्हायरसशी

अभिनेत्री-खासदार नुसरत जहाँनी केलं वादग्रस्त वक्तव्य, भाजपची तुलना केली ‘या’ जिवघेण्या व्हायरसशी

तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करतात. तसेच त्यांचे चाहते म्हणून हे आपल्याला काही नवीन नाही. कधी त्या कट्टरपंथीयांच्या निशाण्याखाली येतात तर कधी त्या त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि म्हणूनच राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत. दरम्यान, नुसरत जहां यांनी एक विधान केले असून त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सध्या जोरदार गदारोळ सुरू झाला आहे.

नुसरत जहां नुकत्याच पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगना येथे मुस्लिम बहुल भागात दिगंगा येथे प्रचारासाठी गेल्या होत्या. या दरम्यान त्यांनी भाजपला कोरोना विषाणूपेक्षा धोकादायक म्हटलं. त्या म्हणाल्या की, भाजप हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दंगल घडवून आणत आहे.

नुसरत जहा्ं जनतेला संबोधित करताना म्हणाल्या, ‘तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवा, भाजपसारखा धोकादायक व्हायरस देशात फिरत आहे. हा पक्ष धर्म भेदभाव करतो आणि लोकांमध्ये दंगल घडवून आणतो. बंगालमध्ये भाजपाची सत्ता आल्यास मुस्लिमांसाठी उलटं काउंटडाउन सुरू होईल.’

नुसरत जहां यांच्या या विधानावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाने मुस्लिम तुष्टीकरण केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, ‘पश्चिम बंगालमध्ये कोव्हीड लसीवर सर्वात घाणेरडे राजकारण सुरू आहे.’

अमित मालवीय यांनी ट्वीट केले की, “प्रथम ममता बॅनर्जी कॅबिनेटचे विद्यमान मंत्री सिद्धिकुला चौधरी यांनी लस वाहून नेणारा ट्रक रोखला. आता टीएमसीचे खासदार दिगंगाच्या मुस्लिमबहुल भागात प्रचार करताना भाजपाची तुलना कोरोनाशी करत आहेत. पण पिशी (ममता बॅनर्जी) गप्प आहेत. का? तुष्टीकरण?”

हे देखील वाचा