Wednesday, October 23, 2024
Home मराठी स्वप्निल जोशीसोबत मुक्ता बर्वे पाहिजे होती, ‘तु तेव्हा तशी’ मालिका झाली जोरदार ट्रोल

स्वप्निल जोशीसोबत मुक्ता बर्वे पाहिजे होती, ‘तु तेव्हा तशी’ मालिका झाली जोरदार ट्रोल

सध्या छोड्या पडद्यावर नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ज्या प्रेक्षकांना खूपच आवडत असल्याचे दिसत आहे. यांपैकीच ‘तु तेव्हा तशी’ या मालिकेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. मालिकेची कथा लोकांना खूपच आवडत आहे  ज्यामुळे त्याला जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मात्र या मालिकेच्या कलाकार निवडीवरुन प्रेक्षकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे इतकेच नव्हेतर त्यांनी या मालिकेला ट्रोलही केले आहे. नक्की काय आहे हा वाद आणि प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, सध्या छोट्या पडद्यावर ‘तु तेव्हा तशी’ या मालिकेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या मालिकेतून मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर झळकत आहे. या मालिकेत स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकरची (Shilpa Tulakar) जोरदार केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. मात्र या जोडीच्या कास्टिंगवरुन चाहत्यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. यामुळेच मालिकेला अनेकांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मालिकेत स्वप्निल जोशीसोबत शिल्पा तुळसकर नव्हेतर मुक्ता बर्वे दिसायला हवी होती, चॉइस चुकली  अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे शिल्पा आणि स्वप्निलच्या जोडीला प्रेक्षकांनी नापसंती दर्शवल्याचे दिसत आहे. या मालिकेत स्वप्निल आणि शिल्पासह अभिनेत्री अभिज्ञा भावे, सुहास जोशी सुनिल गोडबोली अशा दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

‘तु तेव्हा तशी’ मालिकेत कॉलेजमध्ये ओळख असलेल्या अनामिका आणि सौरभ यांची कित्येक वर्षानंतर भेट होती. त्यानंतर त्यांच्यात फुललेल्या गोड प्रेमाची कथा या मालिकेत रंगवलेली आहे. दरम्यान अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांनी  एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत काम केले होते. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. सध्या स्वप्निल जोशी चला हवा येऊ द्या कार्यक्रमात दिसत आहे. या कार्यक्रमात तो प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा