मराठी टेलिव्हिजन आता मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. झी मराठी वाहिनी लवकरच म्हणजे याच महिन्यात १० डिसेंबरपासून ‘हे तर काहीच नाय’ (He Tar Kahich Nay) हा कार्यक्रम चाहत्यांसाठी घेऊन येत आहे. गंमत म्हणजे या कार्यक्रमात तुमची लाडकी अभिनेत्री दिसणार आहे, जिने छोट्या पडद्यावर उत्तम अभिनय सादर करून आपली घराघरात ओळख निर्माण केली आहे. ती म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारून चाहत्यांच्या मनावर आपल्या नावाची छाप टाकणारी मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधर (akshaya deodhar) होय.
‘हे तर काहीच नाय’ या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. खरं तर, या प्रोमोमध्ये देखील खूप छान ट्विस्ट आहे. यात अभिनेत्री आणि मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) काही किस्से शेअर करताना दिसत आहे. या शोमध्ये अक्षया नेमकी कोणती भूमिका साकारणार आहे, हा प्रश्न अनेकांना पडला असेल, तर अक्षया या शोमध्ये प्रथमच सूत्रसंचालन करून चाहत्यांना आश्चर्यचकित करणार आहे.
त्याचबरोबर, शोमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि ‘सैराट’ फेम तानाजी गालगुंडे हे पाहुणे म्हणून दिसणार आहेत. या शो संबधित एकामागोमाग एक सरप्राइज प्रेक्षकांना मिळत आहे. या शोच्या माध्यमातून झी मराठी वाहिनीवर किस्स्यांची चर्चा रंगणार आहे.
https://www.instagram.com/p/CW-02u9tkY7/?utm_source=ig_web_copy_link
झी मराठी वाहिनीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासह असे देखील म्हटले आहे की, “अप्सरासुद्धा किस्से सांगण्यात पुढे हाय, नवा कार्यक्रम ‘हे तर काहीच नाय’ १० डिसेंबरपासून शुक्रवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता.” परंतु असे दिसून येत आहे की, हा कार्यक्रम अनेक प्रेक्षकांना आवडला नाही. त्यांनी कमेंट करत याला नापसंती दर्शवली आहे. ज्यातून असे दिसून येते की, हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच ट्रोल होत आहे.
यावर कमेंट करत एका युजरने लिहले की, “एकदम भंगार विनोद,” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “झी खरंच पांचट झालंय.” आणखी एका युजरने लिहले की, “हे असले जोक बगत बसण्यापेक्षा कार्टूनमधील पेपा पिग बघितलेलं बरं, ते जास्त मनोरंजन आहे.” अशाप्रकारे युजर वेगवेगळ्या कमेंट करत या शोला नापसंती देत आहेत.
अक्षया देवधरबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. तिने या मालिकेत ‘पाठक बाईं’ची भूमिका साकारली होती. तिच्याबरोबर मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत हार्दिक जोशी दिसला होता. राणा पात्राची भूमिका साकारून चाहत्यांची मने जिंकण्यात तो यशस्वी झाला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…