झी मराठी या वाहिनीवर अनेक नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. सगळ्या नवीन मलिकांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच झी मराठीवर आणखी एक नवीन मालिका समोर येणार आहे. झी मराठीवर नवीन ‘हे तर काहीच नाय’ (He Tar Kahich Nay) ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेचे दोन प्रोमो आतापर्यंत समोर आले आहेत. पहिल्या प्रोमोमध्ये अभिनय पुष्कर श्रोत्री त्याच्या आयुष्यातील एक मजेशीर किस्सा सांगताना दिसत आहे. तसेच दुसऱ्या प्रोमोमध्ये सोनाली कुलकर्णी तिच्या आयुष्यातील एक मजेशीर किस्सा सांगताना दिसत आहे. या प्रोमोवरून हा शो काहीतरी मजेशीर असणार आहे, याची जाणीव होते. अशातच आणखी एक बातमी समोर आली आहे की, या शोचे सूत्रसंचालन ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अंजली पाठक म्हणजेच अक्षया देवधर (Akshaya Deodhar) करणार आहे. या मालिकेनंतर अक्षयाने कोणत्याही मालिकेत किंवा चित्रपटात काम केले नाही. या शोमधून ती पुन्हा एका छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. (Tujyat jeev ra ngala game akshaya deodhar host upcoming comedy show he tr kahich nay on Zee Marathi)
https://www.instagram.com/p/CW-02u9tkY7/?utm_medium=copy_link
या शोमध्ये तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि ‘सैराट’ फेम तानाजी गालगुंडे हे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अक्षया पहिल्यांदाच या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहे. हा शो १० डिसेंबरपासून शुक्रवारी आणि शनिवारी रात्री ९: ३० वाजता झी मराठीवर दिसणार आहे. या शोचा प्रोमो पाहून सगळेजण हा शो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
अक्षयाने झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेत तिच्यासोबत हार्दिक जोशी हा मुख्य भूमिकेत होता. सध्या तो झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…