Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘तुला पाहून फ्लॅट झालो राव!’ ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारच्या व्हिडिओवर चाहते झाले फिदा; एकदा पाहाच

‘तुला पाहते रे’ या मालिकेने प्रेमाची परिभाषा बदलली. प्रेम करताना वयाची कसलीही मर्यादा येत नाही, असा संदेश या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांना दिला. अनोख्या कथेमुळे प्रेक्षकांनी मालिकेला भरभरून प्रेम दिले. या मालिकेसोबतच इशा निमकर अर्थातच अभिनेत्री गायत्री दातारनेही चाहत्यांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

सध्या लॉकडाऊनच्या काळात जवळपास सर्वच कलाकार सोशल मीडियावर वेळ घालणे पसंत करतात. त्याप्रमाणे, गायत्रीही सोशल मीडियावर सक्रिय राहून, चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. फोटो असो वा व्हिडिओ, ती सतत काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहते. अलीकडेच तिने आपला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यावर चाहत्यांनी बऱ्याच रंजक कमेंट्स केल्या आहेत.

वास्तविक, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक रील व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती एका डायलॉगवर अभिनय करताना दिसत आहे. यात गायत्री म्हणते, “ओह प्रेम झालंय? माझ्यावर झालंय? मी वाईट आहे यार, तुला नाही मिळू शकत. पण ऐक, निवड वाईट नाहीये तुझी!”

या व्हिडिओखाली गायत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “पसंद बुरी नही तुम्हारी!” यात गायत्रीची अदा पाहून चाहते पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडत आहेत. एवढेच नव्हे, तर कमेंट्स करून तिचे कौतुकही करत आहेत. एक चाहत्याने लिहिले, “छान दिसते. लग्न झालं का?” दुसऱ्याने लिहिले, “तुला प्रेम झालंय का?” एका अन्य युजरने लिहिले की, “मी तर फ्लॅटच झालो राव!”

अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी गायत्री, आता आपल्या कॉमिक टायमिंगने सर्वांना प्रभावित करत आहे. ‘तुला पाहते रे’ मालिका संपल्यानंतर अभिनेत्री आता ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी शोमध्ये काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मास्क न घालता रस्त्यावर ईद साजरी करत होती मुलगी, राखी सावंतने शिकवला चांगलाच धडा; पाहा व्हायरल व्हिडिओ

-अरे व्वा! अगस्त्यने टाकले पहिले पाऊल, हार्दिक आणि नताशाने केला व्हिडिओ शेअर

-‘ओव्हर ऍक्टिंगचे ५० रूपये कट करा’, लस टोचवताना मराठी अभिनेत्रीची नौटंकी पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल!

हे देखील वाचा