Tuesday, July 9, 2024

‘बिग बॉस’ ओटीटीवर कोणत्या हँडसम हंकची होतेय एन्ट्री? नुसता आवाज ऐकूण चाहत्यांची उत्सुकता शिगेला

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये कोण-कोण सहभागी होणार आहे, याबाबत सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. हा शो रविवारपासून म्हणजेच ८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. म्हणूनच शोमध्ये कोणते खेळाडू एन्ट्री करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. गायिका नेहा भसीन आणि भोजपुरी अभिनेत्री- गायिका अक्षरा सिंग यांच्या व्यतिरिक्त अजून कोणाचेही नाव निश्चित झालेल्या स्पर्धकांमध्ये नाही.

बिग बॉसने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात एक माणूस आपल्या मखमली आवाजाने चित्र काढताना दिसत आहे. त्याचा आवाज ऐकूनच चाहते, तो कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. हा प्रोमो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्ही त्याच्या आवाजामुळे प्रभावित झालो होतो, पण त्याची खरी ओळख जाणून घेण्यासाठी थोडा वेळ थांबा. हा हँडसम हंक नक्की आहे तरी कोण?”

हे ट्वीट पाहिल्यानंतर चाहते स्वतःचे अंदाज बांधत आहेत. ‘द खबरी’ने दिलेल्या माहितीनुसार, तो दुसरा कोणी नसून, राकेश बापट आहे. जो अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसला आहे. त्याने ‘तुम बिन’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘कौन है जो सपने में आया’ आणि ‘हिरोईन’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर त्याने टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. त्यात ‘सात फेरे’, ‘कुबूल है’, ‘मेरीदा लेकिन कब तक’, ‘बहू हमारी रजनीकांत’, ‘इश्क में मर जावां’ आणि ‘होंगे जुदा ना हम’ या टीव्ही मालिकांचा समावेश आहे. यात त्याने विशेष भूमिका साकारल्या आहेत.

दरम्यान, २०१९ मध्ये रिद्धी डोगरापासून घटस्फोट घेतल्यावर राकेश बापट प्रसिद्धीच्या झोतात आला. ही जोडी वेगळी झाल्यावर चाहत्यांनाही आश्चर्य वाटले. लग्नाला ८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दोघेही वेगळे झाले. मात्र, दोघांनीही मीडियासमोर त्यांच्या घटस्फोटाबद्दल कधीच वक्तव्य केले नाही.  राकेश बापटबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे की, त्याला चित्रकलेची खूप आवड आहे. इयत्ता नववीत असताना त्यांने चित्रकलेत राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. त्याचे चित्रकलेवर आणि शिल्पकलेवर प्रचंड प्रेम आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा