हिंदी सिनेमाच्या पहिल्या महिला कॉमेडियन ‘टुनटुन’, जमिनीच्या वादातून झाली होती त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या


आपल्या सिनेसृष्टीने असंख्य प्रतिभावान कलाकरांना पाहिले आहे. अगदी सिनेसृष्टीच्या सुरुवातीच्या काळापासून अनेक दर्जेदार कलाकार होऊन गेले. प्रत्येक दशकामध्ये असे कलाकार होते, ज्यांनी फक्त प्रभावी अभिनयामुळे मुख्य कलाकारांएवढीच लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. मात्र, काळाच्या ओघात हे कलाकार मागे पडले आणि विस्मृतीत गेले. जुन्या काळातील प्रेक्षकांना आणि आजच्या पिढीतील काही तरुणांना अशा मोजक्याच लोकांना माहित असलेली अभिनेत्री म्हणजे ‘टुनटुन.’ रविवारी (११ जुलै) टुनटुन यांचा वाढदिवस. यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी. चला तर मग सुरुवात करूया…

साठच्या दशकातील गायिका आणि अभिनेत्री टुनटुन यांचे नाव अनेकांना परिचयाचे असेल. टुनटुन या त्या दशकातील पहिल्या महिला विनोदी कलाकार होत्या. टुनटुन पडद्यावर आल्या की लोकांमध्ये मोठ्याने हसण्याचे आवाज यायला सुरुवात व्हायची. त्यांचे खरे नाव होते, उमादेवी खत्री. मात्र, त्यांचे वजन जास्त असल्याने लोकं त्यांना टुनटुन म्हणू लागली आणि पुढे हेच नाव त्यांची ओळख बनले.

संगीताचे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या टुनटुन यांचा आवाज अतिशय गोड आणि मधुर होता. त्यांच्या आवाजावर नूरजहां आणि शमशाद बेगम यांचा प्रभाव स्पष्ट जाणवायचा. लहानपणापासूनच त्या गाणे गायच्या. रेडिओवर गाणे ऐकून त्या रियाज करायच्या. त्यांची खूप इच्छा होती की, मुंबईला जाऊन गाणे शिकून त्यात करिअर करायचे. मात्र, त्याकाळी मुलींना शिक्षणाची परवानगी नसल्याने त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले नाही. मात्र, त्यांच्या नशिबात मोठ्या पडद्यावर चमकणे लिहिले होते.

त्यांच्या गावातील एका मैत्रिणीसोबत त्या मुंबईला आल्या. त्यांची मैत्रीण खूप चित्रपटवाल्याना ओळखत असल्याने ती त्यांना संगीतकार नौशाद यांच्याकडे घेऊन गेली. तिथे टुनटुन यांनी नौशाद यांना सांगितले की, तुम्ही मला संधी द्या, नाहीतर त्या त्यांच्या बंगल्यातून समुद्रात उडी मारतील. हे ऐकून नौशाद साहेबांनी त्यांचा आवाज ऐकला आणि ते प्रभावित झाले. त्यातून त्यांनी टुनटुन यांना काम दिले. १९४७ साली त्यांना पहिला ब्रेक मिळाला. त्यांनी ‘दर्द’ सिनेमासाठी ‘अफसाना लिख रही हूं’ हे गाणे गायले. हे गाणे खूप गाजले आणि त्या प्रसिद्ध झाल्या.

टुनटुन यांचे हे गाणे पाकिस्तानी अख्तर अब्बास काजी यांना इतके आवडले की, ते भारतात आले आणि त्यांनी टुनटुन यांच्याशी लग्न केले. यानंतर टुनटुन यांनी ४५ गाणी गायली. नंतर प्रेग्नंट राहिल्यामुळे आणि घरगुती जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी कामातून ब्रेक घेतला.

गरोदरपणानंतर त्यांचे वजन खूप वाढायला लागले. नौशाद यांनी त्यांच्यातील अभिनयाची प्रतिभा ओळखली आणि त्यांना ‘बाबुल’ सिनेमात अभिनयाची संधी दिली. त्यांचा अभिनय लोकांना खूप आवडला आणि टुनटुन हळूहळू पहिल्या महिला कॉमेडियन झाल्या. त्यांनी जवळपास २०० चित्रपटांमध्ये काम केले. ९० च्या दशकात त्यांच्या पतीच्या मृत्यनंतर त्यांनी सिनेमांपासून स्वतःला वेगळे करून घेतले.

टुनटुन यांच्या आई- वडिलांची आणि भावाची जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली. टुनटुन २/३ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांच्या आई- वडिलांची हत्या झाली. त्यांना त्यांचा भाऊ सांभाळत होता. मात्र, काही वर्षांनी त्याची देखील हत्या करण्यात आली होती. टुनटुन यांचे ‘आरपार’, ‘प्यासा’, ‘मिस्टर अँड मिसेज फिफ़्टी फाइव’, ‘मोम की गुड़िया’ हे महत्वाचे सिनेमे आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तीन वर्षांच्या वयात हरवले वडिलांचे छत्र; ११ वी नंतर पारसने केली मॉडेलिंगला सुरुवात; ‘या’ अभिनेत्रींशी जोडलंय नाव

-नीतू कपूर सूनेला ठेवतील एखाद्या ‘राणीप्रमाणे’; रिद्धिमा कपूरने सांगितले कसे असेल सासू-सूनेचे नाते

-ओळखा पाहू कोण? सोशल मीडियावर रंगलीय ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याच्या फोटोचीच चर्चा


Leave A Reply

Your email address will not be published.