Tuesday, July 9, 2024

तुर्किश स्टार बुराक डेनिझ पहिल्यांदाच आला भारतात, अभिनेत्याचा स्वॅग पाहून चाहेत अवाक्

तुर्की अभिनेता बुराक डेनिज हा केवळ तुर्कीतच नाही, तर जगभरात लाेकप्रिय आहे. या अभिनेत्याचे फॅन फॉलोइंग खुपच जबदस्त आहे. ‘द इग्नोरंट एंजल्स’, ‘शाहमारन’, ‘अर्दा आणि डोन्ट लीव्ह’ यासारख्या प्राेजेक्टमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अभिनेता ओळखला जातो. अशात अलीकडेच अभिनेता मुंबईत दिसला होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये बुराक एका कार्यक्रमाला जाताना, चाहत्यांशी संवाद साधताना आणि सेल्फी घेताना दिसत आहे.

अभिनेता बुराक डेनिज (burak deniz) याच्या लूकबद्दल बाेलायचे झाले, तर त्याने पांढरा शर्ट आणि पॅंट घातला होता, ज्यामुळे ताे खूपच देखणा दिसत हाेता. या अभिनेत्याला पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला होता. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘Omggggg!!!’, तर दुसर्‍याने कमेंट करत लिहिले की, “अरे! काय स्वॅग आहे.” यासोबतच एका चाहत्याने लिहिले की, ‘मी त्याला 17 वेळा पाहिले.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

खरे तर, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) च्या अंतर्गत मुंबईत आयोजित केलेल्या फ्रेम्स 2023 ला सुरुवात झाली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, FICCI फ्रेम्स फास्ट ट्रॅकच्या 23व्या आवृत्तीत सहभागी हाेण्यासीठी बुराक डेनिज भारतात आला हाेता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

बुराक डेनिज व्यतिरिक्त, आयुष्मान खुराना, अनिल कपूर, मनोज बाजपेयी, भूमी पेडणेकर, आदित्य रॉय कपूर, जिम सरभ, शोभिता धुलिपाला आणि रकुल प्रीत सिंग यांसारख्या प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींसह चित्रपट निर्माते 3 मेपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय कार्यक्रमात सहभागी हाेत आहेत. (turkish star burak deniz visits india and gave shahrukh khan signature pose)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘खतरों के खिलाडी 13’मध्ये शीझान खानला कास्ट केल्यामुळे संतापली तुनिषा शर्माची आई, चॅनला पाठवली कायदेशीर नोटीस

शीझान खानने तुनिषाच्या आईवर साधला निशाणा? म्हणाला, ‘तुम्ही माझी चमक कमी…’

हे देखील वाचा