Sunday, July 14, 2024

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेतील अभिनेत्रीचा झाला गुपचूप साखरपुडा, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सध्या मनोरंजनविश्वातून सतत गुड न्यूज येत आहे. याला मराठी इंडस्ट्री देखील अपवाद नाही. कोणाच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाले तर कोणाच्या घरी सनई चौघडे वाजले आहे. अशातच आता अजून एक अभिनेत्री लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या अमृता पवार लवकरच बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या झी मराठीवर गाजत असलेली ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत असलेली अदिती अर्थात अमृता पवार लवकरच लग्न करणार असून तिने नुकताच गुपचूप तिचा साखरपुडा उरकला आहे.

अमृताने तिच्या या साखरपुड्याबद्दल कोणतीही बातमी दिली नसली तरी एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या साखरपुड्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. प्राप्त होत असलेल्या बातमीनुसार अमृताने इंजिनिअर असलेल्या नील पाटीलला तिच्या आयुष्याचा जोडीदार निवडले आहे. मात्र अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यात एक रिंगचे डिझाईन दिसत असून, त्यात तिचे आणि निलचे नाव लिहिलेले दिसत आहे.

अमृताच्या साखरपुड्याचे फोटो पाहिले तर अमृताने जांभळ्या रंगाची जरीची सिल्कची साडी नेसली असून, त्यावर तिने गोल्डन दागिने घातले आहेत. तर नीलने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातलेली दिसत आहे. अमृताच्या या गोड बातमीमुळे तिच्या फॅन्ससोबतच कलाकारांना देखील सुखद धक्का बसला आहे. अमृताच्या स्टोरीवर अनेक लोकं तिचे अभिनंदन करत तिच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करताना दिसत आहे. अमृताने निवड जोडीदार म्हणून निवड केलेला निल पाटील जरी या क्षेत्रातला नसला तरी तो अमृताला पूर्ण पाठिंबा देतो. साखरपुड्यानंतर अमृता लग्न कधी करणार याबाबत अजून माहिती उपलब्ध नसली तरी, मिळत असलेल्या माहितीनुसार याचवर्षी अमृता विवाहबंधनात अडकणार आहे.

अमृता सध्या ‘तुझ्या माझ्या संसाराला..’ या मालिकेत अदितीची भूमिका साकारत असून, तिच्यासोबत हार्दिक जोशी मुख्य भूमिकेत आहे. याआधी तिने सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारली होती. तर स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ ‘दुहेरी’ या मालिकांमध्ये झळकली असून, २०१९ साली तिने ‘सिनियर सिटिझन’ या चित्रपटामध्ये देखील काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा