तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणारी आदिती म्हणजे अभिनेत्री अमृता पवार खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकली आहे. तिने तिच्या लग्नातील व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले आहेत.
View this post on Instagram
अमृताच्या नवऱ्याचे नाव नील पाटील आहे. अमृता आणि नील यांचा एप्रिल २०२२ मध्ये साखरपूडा पार पडला होता. त्यानंतर आता त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. ती तिच्या लग्नातील लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओवर भरभरून प्रेम व्यक्त केले आहे.
View this post on Instagram
अमृता ही यापूर्वी स्वराज्यजननी जिजामाता आणि जिगरबाज आशा मालिकांमध्ये झळकली आहे.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)










