Sunday, January 12, 2025
Home टेलिव्हिजन भारीच ना! दमदार म्यूझिक व्हिडिओनंतर आता बॉलिवूड पदार्पण करणार अली गोनी?

भारीच ना! दमदार म्यूझिक व्हिडिओनंतर आता बॉलिवूड पदार्पण करणार अली गोनी?

टेलिव्हिजन अभिनेता अली गोनी (Aly Goni) आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या देखण्या लूकचे, अभिनयाचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या पडद्यावरील अभिनयाइतकाच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असतो. आजपर्यंत छोट्या पडद्यावर आपली छाप पाडणारा अली आता लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार आहे.

अभिनेता अली गोनीने २०२० मधील ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर ‘बिग बॉस १४’ मध्ये त्याच्या आणि अभिनेत्री जॅस्मिन भसीनच्या प्रेम प्रकरणाची सर्वत्र चर्चा रंगली होती. या चर्चांना पुर्णविराम देत त्यांनी आपले नाते कबूल केले होते. त्यानंतर अलीने जॅस्मिनसोबत ‘सूट हिप हॉप’ गाण्यातसुद्धा दिसला होता. त्याचबरोबर त्याने मोनी रॉयसोबत ‘जोडा’ गाणे केले होते. आता समोर आलेल्या माहितीनुसार अली गोनी आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

अशातच आता अली गोनी हिंदी चित्रपटातील दिग्गज कलाकारांसोबत आपल्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरूवात करणार आहे. अलीने मात्र अद्याप याबाबत काहीही खुलासा केला नाही. तसेच तो बऱ्याच दिवसांपासून कोणत्याच नव्या कार्यक्रमात दिसला नाही. अली प्रमाणेच त्याची गर्लफ्रेंड जॅस्मिनने पंजाबी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले आहे. जॅस्मिन ‘हनीमून’ या पंजाबी चित्रपटात गिप्पी ग्रेवालसोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंगसुद्धा पूर्ण झाले असून चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबतची माहिती जॅस्मिनने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

तत्पुर्वी अली गोनीने एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, “मला अनेक टीव्ही कार्यक्रमात काम करण्याच्या ऑफर येत आहेत. पण फक्त काम करायचे किंवा प्रेक्षकांसमोर यायचे म्हणून मला काम करायचे नाही, तर त्या कामात मला आनंद मिळेल, माझी भूमिका लोकांना आवडेल, त्याचा त्यांच्या आयुष्यावर परिणाम होईल किंवा मला आव्हानात्नक भूमिका साकारायला मिळेल असेच काम मला हवे आहे.” आता हिंदी चित्रपटात अशीच एखादी भूमिका मिळाली असेल असा अंदाज प्रत्येकाने लावला आहे.

हेही वाचा

हेही पाहा-

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा