Friday, July 12, 2024

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता करतोय ‘या’ गंभीर आजाराचा सामना, सोशल मीडिया पोस्टमधून केले खबरदारीचे आवाहन

कोरोना व्हायरस पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षात अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे, तर अनेक कलाकारांनी या जगाचा निरोपही घेतला आहे. हा व्हायरस दिवसेेंदिवस पसरत आहे. अशातच आता एका प्रसिद्ध अभिनेत्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी येत आहे.

लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता अर्जुन बिजलानीने (Arjun Bijlani) सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले की, तो कोरोना संक्रमित झाला आहे. ‘खतरों के खिलाडी ११’चा विजेता असलेल्या अर्जुने आपल्या तब्येतीबद्दल बोलताना खुलासा केला की, त्याच्यात थोडेफार लक्षणे आहेत. पुढे तो म्हणाला की, कोरोना व्हायरसच्या तावडीत सापडल्यानंतर त्याने स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवले आहे.

अर्जुनने एक इंस्टाग्राम रील शेअर केली आहे. त्या व्हिडिओच्या बॅग्राऊंडला ‘एक मैं हूं और एक तू’ हे गाणे सुरू आहे. व्हिडिओमध्ये अर्जुन टेकडीवर उभा दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने पिवळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. रीलमध्ये त्याने व्हायरसपासून वाचण्याची आणि मास्क घालण्याची विनंती केली आहे. त्याने व्हायरसविरुद्ध योग्य खबरदारी घेण्यासही सांगितले आहे.

त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर अर्जुन ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रियॅलिटी शोच्या नवीन पर्वामध्ये अँकरिंग करताना दिसणार आहे. या रियॅलिटी शोमध्ये किरण खेर, शिल्पा शेट्टी, बादशाह, मनोज मुंतशिर हे परीक्षक म्हणून आहेत.

करीना कपूर खान अमृता अरोरा अनेक बॉलिवूड कलाकार मुंबईमध्ये करण जोहरच्या घरी ठेवलेल्या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतरच ते सर्वजण कोरोना संक्रमित झाले. सोहेल खानची पत्नी सीमा खान आणि संजय कपूर यांची पत्नी महीप कपूर, त्यांची मुलगी शनायादेखील पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान अनेक बॉलिवूड कलाकारांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामध्ये श्रवण राठोड, सतीश कौल, बिक्रमजीत कंवरपाल, पंडित राजन मिश्रा, किशोर नांदलस्कर यांसारख्या कलाकारांचा समावेश होता.

हेही वाचा-

हे देखील वाचा