Saturday, November 23, 2024
Home अन्य तेरा मेरा साथ रहे! तब्बल १० वर्षांनी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले ‘हे’ प्रसिद्ध जोडपे

तेरा मेरा साथ रहे! तब्बल १० वर्षांनी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले ‘हे’ प्रसिद्ध जोडपे

टीव्ही जगतात असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, जे त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत असतात. अनेक मालिकांमध्ये काम करताना त्यांच्यामधील नात्याची चर्चा माध्यमांत होत असते. असेच चर्चेत असलेले कलाकार विवाह बंधनात सुद्धा अडकले आहेत. या पैकीच टीव्हीवरील हिंदी मालिकेत झळकणारी लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता गुरमीत चौधरी आणि देबीना बॅनर्जी होय. चर्चेत असलेल्या प्रेम प्रकरणानंतर गुरमीत आणि देबीना 2011 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. मात्र, आता पुन्हा 10 वर्षांनी त्यांनी दुसर्‍यांदा विवाह केल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

टीव्ही अभिनेता गुरमीत चौधरी आणि देबीना बॅनर्जी यांनी 2008 मध्ये रामायण या मालिकेत एकञ दिसून आले होते. यामध्ये देबीना सीतेच्या, तर गुरमीत रामाच्या भूमिकेत काम करत होता. त्यांच्या या मालिकेला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. मालिकेतील दोघांच्या अभिनयाचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं होतं. याच दरम्यान दोघेही प्रेमात बुडाले होते. एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या दोघांनीही जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. ‘पती पत्नी और वो’ या कार्यक्रमातही दोघांनी एकत्र काम केले होते. याच कार्यक्रमात गुरमीतने देबीनाला लग्नाची मागणी घातल्याचीही माहिती समोर आली होती. 14 फेब्रुवारी, 2011 रोजी व्हॅलेंन्टाईन डेच्या दिवशीच दोघेही विवाहबंधनात अडकले होते. त्यावेळी त्यांनी हिंदू संस्कृतीच्या रीतिरिवाजानुसार विवाह केला होता. परंतु नुकताच त्यांनी बंगाली रीतिरिवाजानुसार पुन्हा एकदा विवाह केल्याची बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे. (TV Actor Gurmit Choudhary and Debina Banerjee Married Twice After 10 Year)

दरम्यान, ही संपूर्ण माहिती गूरमीत आणि देबीना बॅनर्जीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना दिली आहे. वधू-वराच्या पेहरावात ही जोडी खूपच सुंदर दिसत होती. यावेळी गुरमीत ने पांढरी धोती आणि क्रीम चॉकलेटी रंगाचा कुर्ता परिधान केला होता. ज्यामुळे तो खूपच हँडसम दिसत होता. देबीनाने घातलेल्या लाल रंगाच्या साडीमध्ये ती अधिक खुलून दिसत होती. त्यावर तिने सोन्याचे दागिने सुद्धा घातले होते. तिने पूर्णपणे बंगाली वधूचा लूक बनवल्यामुळे ती जास्तच मोहक दिसत होती.

या दोघांची लव्हस्टोरी सुद्धा खूप सुंदर आहे. देबीना गुरमीतला प्रेमाने गुरू म्हणते, तिने पतीच्या नावाचा टॅटू सुद्धा तिच्या हातावर काढला आहे. त्यांच्या लग्नाच्या नवव्या वाढदिवसाला पतीच्या नावाचा ‘गुरू’ असा टॅटू काढला होता, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

दरम्यान गुरमीत हा हिंदी मालिकेतील देखणा अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक लोकप्रिय मालिकेत त्याने काम केले आहे. ज्यामध्ये ‘गित हुई सबसे पराई’, ‘पुनर्विवाह’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या मालिकांचा समावेश आहे. त्याने हिंदी चित्रपटातही काम केले आहे. त्याचप्रमाणे देबीना सुद्धा ‘संतोषी मा,’ ‘यम है हम’, ‘विष: एक जहरीली कहाणी’ इत्यादी लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली आहे. तिची ‘अलादिन नाम तो सुना होगा’ ही शेवटची मालिका ठरली. यामध्ये केलेल्या तिच्या खलनायकी भूमिकेचे खूप कौतुक झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

-आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरण आणि रिया चक्रवर्ती प्रकरण जोडणारा ‘हा’ आहे सारखाच दुवा

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा