Saturday, June 29, 2024

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्याला अटक; पत्नी निशा रावलने केली होती तक्रार

स्टार प्लस या चॅनेलवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे करण मेहरा. त्याला सोमवारी (३१ मे) पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर येत आहे. करणने मारहाण केल्यामुळे पत्नी आणि अभिनेत्री निशा रावलने तक्रार दाखल केली होती. ही तक्रार करताना तिने सांगितले होते की, करणने आधी तिच्यासोबत भांडण केले आणि नंतर तिला मारहाण केली.

या घटनेनंतर निशाने गोरेगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तिने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी करणला अटक केले. करणवर ३३६, ३३७, ३३२, ५०४, ५०६ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून निशा आणि करणच्या नात्यात वाद होत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण करणने या सगळ्या गोष्टी खोट्या असल्याची माहिती दिली होती. सोमवारी दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की, कोव्हिड काळात निशाने त्याची खूप काळजी घेतली आहे.

करणने त्याच्या मुलाखतीत सांगितले होते की, ‘मागील काही दिवसांपासून तो एका पंजाबी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मागील दोन आठवडे खूप तणावग्रस्त होते. शूटिंग करताना त्याचे अंग दुखायला लागले होते. त्याला कोरोनाची लक्षण दिसत होती. त्यांनतर तो मुंबईला आला आणि त्याने कोरोना चाचणी केली, तेव्हा ती निगेटिव्ह आली. त्यानंतर त्याने पुन्हा टेस्ट केली, तेव्हा ती पॉझिटिव्ह आली.’ पुढे त्याने सांगितले की, ‘माझी तब्बेत ठीक नव्हती, तेव्हा माझी पत्नी निशाने माझी खूप काळजी घेतली.’

करण मेहरा आणि निशा रावल हे जवळपास 5 वर्ष रिलेशनमध्ये होते. त्यांनतर त्यांनी 2012 मध्ये लग्न केले. ‘हंसते हंसते’ च्या सेटवर त्या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. करण जेव्हा बिग बॉसमध्ये गेला, तेव्हा निशा प्रेग्नेंट होती. त्या दोघांना एक मुलगा आहे. त्याचा जन्म 2017 मध्ये झाला होता.

कामाबद्दल बोलायचे झाल्यास, करण मेहराने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळवली आहे. या एकाच मालिकेने त्याला खूप ओळख दिली. निशाने ‘हंसते हंसते’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच या दोघांनी ‘नच बलिये’ मध्ये देखील भाग घेतला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा