टेलिव्हिजन अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) आणि त्यांची पत्नी निशा रावल (Nisha Rawal) यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून काहीही चांगले चालले नाही. गेल्या वर्षी निशाने करणवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता, त्यानंतर अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. करणला अटक केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. मात्र, काही तासांनंतर करणला जामीन मिळाला. तेव्हापासून त्यांचा मुलगा काविशच्या ताब्यात घेण्यावरून दोघांमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. या प्रकरणावर करणने बराच वेळ मौन बाळगले होते. त्याने अलीकडेच एका पत्रकार परिषदेत निशावर अफेअर असल्याचा आरोप केला होता. करणच्या आरोपांवर निशाने मौन तोडले आहे. करणच्या या आरोपावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
करण मेहराने मुंबईतील पत्रकार परिषदेत निशावर अफेअर असल्याचा आरोप केला होता. निशा त्याच्या घरात रोहित सेठिया नावाच्या व्यक्तीसोबत राहत असल्याचेही त्याने म्हटले आहे. करणच्या आरोपांवर निशानाने प्रतिक्रिया दिली आहे. तिने यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
करणच्या पत्रकार परिषदेनंतर काही तासांनी निशाने करणच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहेत. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखातीत तिने सांगितले आहे की, “मला यावर काही भाष्य करायचे नाही.” त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या आहेत आणि मी त्यांच्या प्रत्येक विधानाचा प्रतिकार करू शकत नाही. करणच्या आरोपांवर निशाने आतापर्यंत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.
निशाचे विवाहबाह्य संबंध सुरू असल्याचे करणने पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्याने सांगितले की, “रोहित हा तिचा मानलेला भाऊ आहे. ज्याने आमचं कन्यादान सुद्धा केले होते. माझ्याकडे आधी पुरावे नव्हते म्हणून मी काही बोललो नाही. आता मी कोर्टात पुरावे सादर केले आहेत, त्यानंतर आज मी याबद्दल बोलणार आहे.” अशाप्रकारे त्याने वक्तव्य केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘या’ कलाकारांना देखील करावा लागलाय कास्टिंग काऊचचा सामना
करिअरच्या पिकवर आलियाचा आई बनण्याचा निर्णय योग्य की अयोग्य? करीना कपूरने मांडले मत
बॉलिवूडमध्ये डेब्यू करताच जेनेलियाने दिले रितेशला तिचे मन, पुढे ‘असा’ होता तिचा प्रवास