Friday, July 5, 2024

कशाच्या भीतीमुळे दीपिकाने लपवली प्रेग्रेंसी?, शाेएबने वेदना व्यक्त करत सांगितले कारण

ससुराल सिमरन का‘ फेम दीपिका ककरने अखेर ती लवकरच आई होणार असल्याचे मान्य केले आहे. ती लवकरच तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिमसोबत तिच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे. दीपिका तिच्या लग्नाच्या 4 वर्षानंतर आई होणार आहे. अशा परिस्थितीत दाम्पत्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबही त्यांच्यासाठी खूप आनंदी आहे. दरम्यान, दीपिकाच्या पतीने आपल्या पत्नीच्या पहिल्या प्रेग्नेंसीबद्दल बरेच काही सांगितले आणि तिने इतका मोठा आनंद लोकांपासून का लपविला हे देखील सांगितले.

शोएब (shoaib ibrahim) याने त्याच्या यूट्यूब चॅनलवरून एक व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये तो दीपिकाच्या प्रेग्नेंसीबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये शोएबने दीपिकाची प्रेग्नेंसी लपवण्याचे कारणही उघड केले आहे. यासाठी त्याने दीपिकाच्या प्रेग्नेंसीचे कारण सांगितले आहे.

शाेएबने सांगितले प्रेग्नेंसी लपवण्याचे कारण
व्हिडिओच्या सुरुवातीला शोएब दीपिकाची प्रेग्नेंसी लपवण्याबद्दल बोलतो आणि म्हणतो की, “आम्हाला तीन महिने प्रेग्नेंसी लपवण्यास सांगण्यात आले होते. आमच्या अम्मीचे म्हणणे आहे की, 3 महिन्यांच्या गर्भधारणेबद्दल काहीही बोलू नये. त्यामुळे ही गोष्ट आम्ही तीन महिने लपवून ठेवली. पण आता सर्व ठीक आहे, सर्व टेस्ट नॉर्मल आहेत तर आम्ही आमच्या चाहत्यांना आनंदाची बातमी देऊ इच्छितो की दीपिका प्रेग्नेंट आहे.”

दीपिकाचे झाले मिसकॅरेज
व्हिडिओमध्ये शोएबने दीपिकाचा गेल्या वर्षी गर्भपात झाल्याचा खुलासाही केला आहे. व्हिडिओमध्ये शोएब सांगतो, गेल्या वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चच्या शेवटी दीपिकाचा गर्भपात झाला होता. ती 6 आठवड्यांची प्रेग्नेंट होती. अशा परिस्थितीत बाळ गमावल्याचे दुःख होते. म्हणूनच यावेळी आम्ही सर्वखबरदारी घेत होतो, पण आता सर्व काही ठीक आहे.(tv actor shoaib ibrahim open up about wife dipika kakar miscarriage said we were scared before announced her 1st pregnancy )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाथरूमच्या भिंतीतून बाहेर आले नोटांचे बंडल; प्रश्न उपस्थित झाल्यावर अभिनेत्री म्हणाली, ‘वेश्याव्यवसाय करून…’

‘मी पैशांसाठी नाही तर…’, करण जोहरच्या दोस्ताना 2 मधून बाहेर पडण्याचं कारण, कार्तिक स्पष्टच बोलला

हे देखील वाचा