Wednesday, July 3, 2024

टेलिव्हिजनवरील ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याला झाला स्टेज 4 चा कॅन्सर, भावनिक व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता ‘निशा और उसके कजिन’ फेम विभू राघवने (Vibhu Raghave) त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत मोठा खुलासा केला आहे. विभूला स्टेज 4 चा कॅन्सर झाल्याचे त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले. विभूने त्याच्या कीमोथेरेपीला सुरुवात केली असून. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. विभूने त्याच्या व्हिडिओआधी त्याचा एक फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट शेअर केली.

विभूने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “किमो सुरु होण्याच्या दोन दिवस आधी मी या प्रवासाआधी माझा पहिला फोटो काढण्याबद्दल विचार केला, कारण येणाऱ्या दिवसांमध्ये खूप काही बदलणार हे तर निश्चित आहे. माझे शरीर, माझा चेहरा, माझे केस, माझी दैनंदिन आयुष्य, माझी ताकद, माझ्या मर्यादा सर्वच काही बदलून जाणार, रोजच्या उपचारांच्या प्रक्रियांमध्ये होणाऱ्या बदलांना मला आपलेसे करावे लागणार असून, पुढे चालावे लागेल. तुम्ही मला शुभेच्छा द्या, माझ्यासाठी प्रार्थना करा आणि माझ्यासाठी काहीतरी चविष्ट जेवण करा.”

पुढे विभूने त्याचा हॉस्पिटलमधला एक व्हिडिओ शेअर करत सांगितले, “मी रूग्णालयात आहे. काय सुरू आहे, हे तुम्हाला सांगावे असा विचार केला. मी गेल्या काही दिवसांपासून आजारी होतो. दोन आठवड्यांपूर्वीच मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. मला स्टेज 4 कॅन्सर आहे आणि तो धोकादायक आहेत. आयुष्यात असे काही घडेल, असा मी अजिबात विचार केला नव्हता. पण एका दिवसांत सर्व काही बदलले. सगळे काही उध्वस्त झाले. माझ्या आजूबाजूला चांगले डॉक्टर्स आहेत. चांगली टीम आहे आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आहे. सगळे माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत. चला, चांगल्याची आशा करूया.” असे सांगणाऱ्या विभूला या व्हिडीओमध्ये त्याच्या भावना अनावर झाल्या आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.

विभू मागील बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. त्याची ही पोस्ट पाहून अनेक कलाकारांनी त्यावर कमेंट्स करत त्याला प्रोत्साहन देत लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

हेही वाचा –

हेही पाहा- 

हे देखील वाचा