Wednesday, June 26, 2024

सोशल मीडियावर ट्राेल करणाऱ्यांना दीपिका चिखलियाने दिले चाेख उत्तर; म्हणाली, ‘मी नेहमीच सीता…’

टीव्ही इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका चिखलिया हिला कोण ओळखत नाही. रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण’ या मालिकेत आई सीतेची भूमिका साकारून दीपिका घराघरात प्रसिद्ध झाली. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. गेल्या काही दिवसांमध्ये अभिनेत्री बॉलीवूड गाण्यांवर किंवा कोणत्याही भजनावर रील बनवायची आणि शेअर करायची, ज्यासाठी तिला खूप ट्रोल केले जायचे. अशात आता अलीकडेच अभिनेत्रीने ट्राेलर्सना चाेख उत्तर दिले आहे. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

रामायणातील सीता म्हणजेच दीपिका (dipika chikhlia) हिने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्रीला बॉलिवूड गाण्यांवर डान्स करायला आवडते. यामुळे काही लोक तिचे कौतुक करतात, तर  काही लोक तिला ट्रोल देखील करतात. अशात आता अभिनेत्रीने तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘ती या ट्रोल्सना तिच्यावर वर्चस्व गाजवू देत नाही आणि त्यांना चोख प्रत्युत्तरही देते.’

अभिनेत्रीला ट्राेलिंग केल्याबद्दल दीपिकाने सांगितले की, “जर ती पब्लिक फिगर असेल तर प्रत्येकजण तिच्याबद्दल सर्व प्रकारे बोलेल. त्याचे मत बनवेल.” अभिनेत्री म्हणाली की, “काही लोकांना फक्त त्रास कसा द्यायचा हे माहित असते, पण काही लोक खरंच प्रेम देतात. म्हणूनच मी कायमच आपल्या प्रियजनांना दुःखी न करण्याचा प्रयत्न करते. मी एव्हरग्रीन गाण्यांवरही रील बनवते, ज्यामुळे प्रतिष्ठाही राखली जाईल.”

अभिनेत्री म्हणाली, “लोक मला मॅसेज करतात की, ते मला माता सीता म्हणून पाहतात. त्यामुळे त्यांचा असा हाेतू असताे की, अशा रिल्स बनवू नयेत. असे कपडे घालू नयेत. लोक म्हणतात की, त्यांना माझ्यामध्ये माता सीतेची प्रतिमा दिसते. मात्र, लोकांनी समजून घेतले पाहिजे की, मी व्यवसायाने अभिनेत्री देखील आहे आणि त्यापूर्वी मी एक माणूस आहे. मी नेहमीच सीता असू शकत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Dipika (@dipikachikhliatopiwala)

दीपिकाने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितले की, “ती अरुण गोविलसोबत एका चित्रपटात येत आहे. यामध्ये ती रागीट पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.” दीपिका म्हणाली की, ‘ती एक अभिनेत्री म्हणून वेगवेगळे पात्र साकरण्याची इच्छा बाळगते.'(tv actress dipika chikhlia message to trolls on her clothes and reels says respect my choice )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ओ…हो…! करण जोहर त्याच्या आगामी सिनेमात शाहरुख खान नाही तर ‘या’ सुपरस्टार अभिनेत्यासोबत करणार काम?

मेट गालाच्या रेड कार्पेटवर आलियाने घातला एक लाख मोत्यांचा ड्रेस, जाणून घ्या ड्रेसेची विशेषता

हे देखील वाचा