कोरोनामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सर्व कलाकार आपापल्या घरात बंद झाले आहेत. ईदचा पवित्र सण कलाकारांनी आपापल्या घरी राहूनच साजरा केला आहे. गौहर खाननेही पती झैद दरबारसोबत घरी ईद साजरी केली आहे. यावेळी, तिचे संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले. गौहरच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांची ही पहिली ईद होती. यासंदर्भात अभिनेत्रीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्रीने ईदच्या दुसऱ्या दिवशी आपली इंस्टाग्राम स्टोरी अपडेट केली. या स्टोरीमध्ये तिने तिच्या वडिलांबद्दलही विशेष आपुलकी व्यक्त केली आहे. स्टोरीमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये गौहर खानचे वडील स्पष्ट दिसू शकतात. गौहरने वडिलांचा हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “ईदच्या या खास प्रसंगी मला तुमची खूप आठवण आली. आय लव्ह यू माय स्टाईल आयकॉन. आय लव्ह यू माझे गुरू. आय लव्ह यू माझे वडील. मी तुमच्या खूप प्रेम करते.”
काही दिवसांपूर्वी गौहर खानसोबत एक अपघात झाला होता. खरं तर झाले असे की, तिला भेट म्हणून एक खूप छान फोटो फ्रेम मिळाली होती. अभिनेत्रीने याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले होचा. गौहरला भेट म्हणुन मिळालेली ही फोटो फ्रेम तिच्या पायावर पडली आणि त्यामुळे तिच्या पायाला सूजही आली होती.
आता गौहरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे तिचे चाहते नाराज झाले आहेत. गौहर खानने इंस्टा स्टोरीमध्ये एक फोटो शेअर करत लिहिले की, “पूर्णपणे सूज आली आहे. मी अत्यंत उत्साही होते आणि एक जड फ्रेम माझ्या पंज्यावर पडली.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खानने मागितली आईची माफी; फोटो शेअर करत म्हणाला…
-डीप नेक बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाच्या जीवघेण्या अदा! पाहून तुम्हीही व्हाल घायाळ