Friday, July 5, 2024

टिव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट वाढदिवस, वयाच्या १० व्या वर्षीच झळकली होती चित्रपटात

जेनिफर विंगेट (jennifer winget) हिंदी टेलिव्हीजन जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सिने जगतात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. जेनिफर विंगेटने अनेक गाजलेल्या मालिकांंमध्ये काम केले आहे ज्यामधील तिच्या भूमिका प्रेक्षकांना चांगल्याच आवडल्या होत्या. या मालिकांमधील तिच्या अभिनयाचेही चांगलेच कौतुक झाले होते. ३० मे जेनिफर विंगेटचा वाढदिवस. जाणून घेऊया तिच्या सिने जगतातील प्रवासाबद्दल. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1)

टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटचा जन्म 30 मे 1985 रोजी मुंबईत झाला. ती अर्धी पंजाबी आणि अर्धा महाराष्ट्रीयन ख्रिश्चन आहे. जेनिफर विंगेटने वयाच्या 10 व्या वर्षी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आमिर खान आणि मनीषा कोईराला यांच्या ‘अकेले हम अकेले तुम’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 1997 मध्ये ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटात जेनिफर विंगेटने बालकलाकार म्हणून काम केले होते. यामध्ये तिने या चित्रपटात शाळेत जाणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती.जेनिफर विंगेटने अरविंद स्वामी आणि मनिषा कोईराला स्टारर ‘राजा को रानी से प्यार हो गया’ या चित्रपटात 2000 साली छोट्या तनूची भूमिका साकारली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1)


त्याचबरोबर 2003 मध्ये आलेल्या ‘कुछ ना कहो’मध्ये जेनिफर विंगेटने अभिषेक बच्चनच्या ऑन-स्क्रीन चुलत बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अभिषेकसोबत ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत होती.’राजा को रानी से प्यार हो गया’ आणि ‘राजा की आयेगी बारात’ यांसारख्या चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केल्यानंतर जेनिफर ही लोकप्रिय टीव्ही स्टार झाली.जेनिफर विंगेट 19 वर्षांची असतानाच तिने टिव्ही जगतात लोकप्रियता मिळवली. त्यानंतर तिने टीव्ही शो ‘कार्तिका’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती, हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. 2008 मध्ये, तिने एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ शोमध्ये अनुराग-प्रेरणा यांच्या मुलीची ‘स्नेहा’ ची भूमिका साकारली होती, जेनिफर विंगेटने 2016 च्या ‘बेहद’ मालिकेसह अनेक कार्यक्रमांमध्ये काम केले. या शोमध्ये तिने पहिल्यांदा नकारात्मक भूमिका साकारली होती. कार्यक्रमाचा दुसरा सीझन डिसेंबर 2019 मध्ये संपला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-

पहिल्या चित्रपटानंतरच कृष्णा अभिषेक झाला होता नैराश्याचा शिकार, कंटाळून पुन्हा एकदा वळला होता छोट्या पडद्याकडे

BIRTHDAY SPECIAL | पाच वर्षाचे नाते आणि मग कायमचा विरह, असे आहे कीर्ती कुल्हारीची लव्हलाईफ

हे देखील वाचा