Monday, June 23, 2025
Home अन्य कुणी तरी येणार येणार गं! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी हलणार पाळणा; ‘थंगबली’ बनणार बाबा

कुणी तरी येणार येणार गं! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी हलणार पाळणा; ‘थंगबली’ बनणार बाबा

सध्या छोट्या पडद्यावरून आनंदाच्या बातम्या समोर येत आहेत. काही अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकण्यास सज्ज झाल्या आहेत, तर काही अभिनेत्रींनी लवकरच आई होणार आहेत. यामध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री क्रतिका सेंगरचाही समावेश आहे.

अभिनेत्री क्रतिका आणि तिचा पती तसेच अभिनेता निकितन धीर यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. ही आनंदाची बातमी खुद्द अभिनेत्री क्रतिकाने सोशल मीडियावर दिली आहे. बॉलिवूड चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा निकितन आणि क्रतिकासोबतच प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांच्यासाठीही ही आनंदाची बातमी आहे. कारण, ते आजोबा बनणार आहेत. निकितन हा पंकज यांचा मुलगा आहे. (TV Actress Husband Nikitan Dheer Is Pregnant She Is Daughter In Law of Mahabharat Fame Actor Pankaj Dheer)

क्रतिकाला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. अनेक मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. क्रतिकाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या पतीसोबतचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. क्रतिकाने निकितन धीरसोबतचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “धीर ज्युनिअर २०२२ मध्ये येणार आहे, हर हर महादेव ओम.”

क्रतिकाच्या या पोस्टवर बॉलिवूड आणि टीव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्री तिचं अभिनंदन करत आहेत. अनिता राज, अंकिता लोखंडे, गौहर खान, किश्वर मर्चंट, स्मृती खन्ना, अक्षरा सिंग, रिद्धिमा पंडित यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी क्रतिका आणि निकितनचे अभिनंदन केले आहे. क्रतिका सेंगरने शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार मानले आहेत.

‘राणी लक्ष्मीबाई’ची भूमिका साकारण्यासाठी क्रतिका सेंगरचे खूप कौतुक करण्यात आले. तिने ‘कसम तेरे प्यार की’, ‘छोटी सरदारनी’ यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तसेच, तिचा पती निकितन धीर हा सुप्रसिद्ध कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक पंकज धीर यांचा मुलगा आहे. निकितन ‘दबंग २’, ‘रेड्डी’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता, पण निकितनला शाहरुख खानच्या सुपरहिट चित्रपट ‘चेन्नई एक्सप्रेस’मधून प्रसिद्धी मिळाली. खलनायक ‘थंगाबली’ची भूमिका साकारून निकितनने खूप लोकप्रियता मिळवली होती. निकितन आणि क्रतिका यांचे २०१४ साली लग्न झाले होते, आता दोघेही पालक होणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ ‘जय भीम’च नाही, तर ‘हे’ चित्रपट देखील आहेत सत्य घटनांवर आधारित, टाका एक नजर

-कर्नाटक वन विभागातील हत्तीच्या पिल्लाला देण्यात आले सुपरस्टार पुनीत राजकुमारचे नाव, सदैव राहणार आठवणीत

-वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…

हे देखील वाचा