कलाकार आपल्या अभिनयाने सुप्रसिद्ध होतात, तसेच एखाद्या चुकीच्या वक्तव्यामुळेही प्रसिद्ध होतात. कलाविश्वात काम करत असताना त्यांना सामाजिक भान राखून काम करावे लागते. कलाकारांचे चाहते कोणत्याही जातीधर्माचे वेगवेगळ्या पंथाचे आणि वर्णाचे असतात. त्यामुळे कुणाच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे असते. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या, तर याच सुप्रसिद्ध कलाकारांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमध्ये बबिता जीची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता काही कारणास्तव मालिकेपासून दूर होती. परंतु तिच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आहे. मुनमुनने या मालिकेमधील कामाला आता पुन्हा सुरुवात केली आहे. तिने मधल्या काळात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत काम करणे बंद केले होते. याचे कारण तिने अद्याप स्पष्ट केलेले नाही. (TV actress Munmun Dutta is come back on Taarak Mehta Ka ooltah chashmah serial)
खरं तर मे महिन्यामध्ये अभिनेत्री चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तिने एका समाजाविषयी जातीवाचक शब्दप्रयोग केला होता. त्यावर तिने सर्वांची माफी देखील मागितली. मुनमुनने माफी मागत असे म्हटले होते की, “मी जो व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यामध्ये वापरलेले शब्द हे मी एक विनोद म्हणून वापरले होते. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, तरीही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मला माफ करा.” असे ट्वीट करत तिने माफी मागितली. तसेच तिने तो व्हिडिओ डिलीट केला.
त्यांनतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे प्रोड्यूसर असित मोदी हे तिला असे म्हटले होते की, “फक्त ट्विटरवर माफी मागून चालणार नाही. तुला पुन्हा एकदा माफी मागावी लागेल.” परंतु तिने याला नकार दिला आणि तेव्हापासून ती या मालिकेत दिसली नाही. आता या विषयावर अधिक चर्चा नको म्हणून दोघांनी यावर विचार विनिमय करत योग्य तो निर्णय घेतला आहे, आणि मुनमुन पुन्हा एकदा या मालिकेमध्ये रुजू झाली आहे.
मुनमुनच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००४ मध्ये ‘हम सब बाराती’ या मालिकेमधून अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमध्ये तिने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. या मालिकेमधूनच ती घराघरात पोहोचली. तिच्या आतापर्यंतच्या यशामध्ये या मालिकेचा मोठा वाटा आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात
-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ