आदिल खान दुर्रानीसोबतच्या सीक्रेट लग्नामुळे अभिनेत्री राखी सावंत चांगलीच चर्चेत आली आहे. राखी सतत सांगत होती की, तिने आदिलशी इस्लामनुसार लग्न केले आहे आणि इस्लाम धर्म स्वीकारला, पण आदिल सर्वांसमोर हे लग्न स्वीकारत नव्हता. अशात आता आदिलनेही आपल्या लग्नाबाबत मौन तोडले असून एक वक्तव्य केले आहे. आदिलने राखी सावंतसोबतचे लग्न मान्य केले असून, तो त्याच्या कुटुंबीयांना समजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याने सांगितले. या सगळ्यात इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर राखी सावंत हिजाब परिधान करताना दिसली आहे.
खरं तर, राखी सावंत (rakhi sawant) हिने आता तिचा एक नवीन व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हिजाब परिधान करताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला राखीने भगव्या रंगाचा हिजाब परिधान केला असून ती या व्हिडिओमध्ये आदिलसोबत मस्ती करताना देखील दिसत आहे. याआधीही राखीने इन्स्टाग्राम अकाउंटवर मॅरेज सर्टिफिकेटद्वारे तिच्या आणि आदिलच्या लग्नाचा खुलासा केला होता.
View this post on Instagram
राखी सावंतसोबतच्या लग्नाची कबुली देताना आदिल म्हणाला, “माझे आणि राखीचे लग्न झाले आहे आणि आम्ही दोघे एकत्र आनंदी आहोत. याची माहिती कुटुंबीयांना आहे, मात्र त्यांनी अद्याप ते मान्य केले नसून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.आधी मी हे नाकारत होतो, पण नंतर मला कळले की, जिथे राखी आहे तिथे कॉन्ट्रोवर्सी देखील आहे. अशा स्थितीत मला वाटले की, मीडियामध्ये इतक्या गोष्टी घडत असताना लग्नाची बाब मान्य करायला हरकत नाही.”
View this post on Instagram
माध्यमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान राखीने सांगितले होते की, ‘आदिलसोबत लग्न केल्यानंतर तिने स्वतःच्या इच्छेने इस्लाम स्वीकारला आणि आदिलने प्रेमाने तिचे नाव राखी बदलून फातिमा केले, जे तिला खूप आवडले.'(tv actress rakhi sawant shares video of wearing bhagwa hijab adopted islam became fatima after marriage adil khan durrani )
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आलिया भट्टला मेकअपशिवाय पाहिलंय? अभिनेत्रीने स्वत: शेअर केला फोटो, एकदा पाहाच
चौकशीदरम्यान उर्फी जावेदनी नोंदवला जबाब; म्हणाली, ‘मला भारताच्या राज्य घटनेने…’










