Tuesday, July 9, 2024

राखी सावंत बनली ‘गंगूबाई’! बुरखा-हिजाबमध्ये पोलिस स्टेशनबाहेर पडली अन्…

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत सतत काेणत्या ना काेणत्या कारणाने चर्चेत असते. राखीने गेल्या काही दिवसांपुर्वी तिच्या लग्नाचा खुलासा केला, त्यानंतर तिने तिच्या पतीवर म्हणजेच आदिल खान दुर्रानी यांच्यावर आरोप केला की तो तिच्याशी बोलत नाही, ज्यानंतर कसे तरी राखीचे वैवाहिक आयुष्य पुन्हा रुळावर आले, पण आता ती एका नव्या संकटात सापडली आहे. राखी सावंतला गुरुवारी (दि. 19 जानेवारी)ला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. शर्लिन चोप्राशी संबंधित एका प्रकरणाबाबत तिची येथे चौकशी करण्यात आली. मात्र, जेव्हा राखीची सुटका झाली तेव्हा चौकशी संपल्यानंतर राखी पोलीस स्टेशन बाहेर असे काही वागली, ज्यामुळे सर्वांनाचा आश्चर्य झाले.

राखी सावंत (rakhi sawant ) पोलिस स्टेशनमधून बाहेर आली तेव्हा ती पूर्ण ‘गंगूबाई’ स्टाईलमध्ये पोज देताना दिसली. मीडियासमोर येताच राखीने हात उंचावून त्यांना अभिवादन केले आणि नंतर पती आदिलसोबत कारमध्ये बसून निघून गेली. राखीचा हा व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीची स्टाइल पाहून अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. राखीच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी तिच्या वागणुकीला ड्रामा म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

खरं तर, गेल्या वर्षी 9 नोव्हेंबरला अभिनेत्री शर्लिन चोप्राने राखी सावंतविरोधात गुन्हा दाखल केला होता. शर्लिनने राखीवर आरोप केला होता की, राखीने कोणतेही कारण नसताना तिच्या आणि बॉलिवूडमधील भांडणात उडी मारली. शर्लिनच्या तक्रारीनंतर आता आंबोली पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत राखीला 19 जानेवारी रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतले. वृत्तानुसार, राखीने चौकशीत पूर्ण सहकार्य केले, त्यामुळे चौकशी संपल्यानंतर पोलिसांनी तिला घरी जाण्याची परवानगी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अशा परिस्थितीत जेव्हा राखी पोलिस स्टेशनमधून बाहेर आली, तेव्हा ती वेगळ्याच तणावात दिसली. बाहेर येताच राखीने हात वर करून गंगूबाई स्टाईलमध्ये नमस्कार केला. विशेष बाब म्हणजे व्हिडीओमध्ये सर्वांचे लक्ष राखीच्या मेकअपवर होते, जे पोलिस स्टेशनमध्ये तासनतास घालवल्यानंतरही व्यवस्थित होते. तिने काजळ, मस्करा आणि लिपस्टिक लावले आहे, ज्यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.(tv actress rakhi who embraces islam to marry adil durrani releases from police station poses as gangubai wearing hijab and burqa )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गरिबांची सनी लियोनी’, म्हणत नेटकऱ्यांनी केले सई ताम्हणकरला फोटोशूटवरून ट्रोल

‘…तुझ्या बद्दल मी काय लिहिणार!’, गौरव मोरेंसाठी समीर चौगुले यांनी शेअर केली खास पोस्ट

हे देखील वाचा