Wednesday, July 3, 2024

अनुपमाच्या घरी आला नवा पाहुणा, व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना दिली माहिती

टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली सध्या तिच्या ‘अनुपमा‘ मालिकेमुळे चर्चेत आहे. अशातच रुपाली गांगुलीने तिच्या घरी एका नवीन पाहुण्याचे स्वागत केले आहे. रुपालीने नुकतीच मर्सिडीज कार खरेदी केली आहे. अभिनेत्रीने या कारचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये रुपाली पती आणि मुलासोबत कारसमोर पोज देताना दिसत आहे. नवीन पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी रुपालीने केकही कापला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी रुपाली गांगुलीचेही अभिनंदन केले आहे.

कार खरेदी केल्यानंतर रुपाली गांगुली (rupali ganguly) हिने नवीन पाहुण्याचे स्वागत केले. रुपालीने तिचा पती अश्विन वर्मा आणि मुलगा रुद्राक्षसोबत हा आंनद साजरा केला. नवीन गाडीच्या आनंदात रूपालीने केक कापला. यानंतर सेलिब्रेशन करत गाडी त्यांच्या घरी नेली. यादरम्यान रुपालीच्या पती आणि मुलाच्या चेहऱ्यावर हसूही पाहायला मिळाले. हा व्हिडिओ पोस्ट करत रुपालीने तिच्या पतीचे आभार मानले आणि लिहिले, “माझ्या स्वप्नांनाना साथ देण्याासाठी धन्यवाद. माझी स्वप्ने प्रत्यक्षात आणल्याबद्दल धन्यवाद.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rups (@rupaliganguly)

रुपाली गांगुली सध्या तिच्या ‘अनुपमा’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. या शाेमध्ये राेज नव-नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. यासोबतच या शोमध्ये अनुपमाचीही बरीच चर्चा आहे. अनुपमा ही मालिका चाहत्याना खूप आवडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rups (@rupaliganguly)

अनुपमा मालिका टीआरपी शाेमध्ये टॉपवर राहते. या शोचे नावही आघाडीच्या मालिकांमध्ये गणले जाते. तसेच या शोच्या कथेबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक असतात. यासाेबतच शोची स्टारकास्टही चर्चेत असते. सध्या रुपालीच्या घरी जल्लोषाचे वातावरण आहे. त्याचवेळी चाहत्यांनी रुपालीला नवीन कारसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. तर काही युजर्सनी नवीन कारबद्दल मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. यावर प्रति उत्तरास अभिनेत्रीनेही चाहत्यांचे आभार मानले आहे.(tv actress rupali ganguly buys mercedes car shared loving video with fans whole family )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नीना गुप्तांच्या मुलीने थेट वडिलांसमोरच केलं पतीला किस, व्हायरल व्हिडिओवर नेटेकऱ्यांनी व्याक्त केला संताप

राखीवर कोसळलाय दु:खाचा डोंगर! काही दिवसांपूर्वीच वडीलांच निधन आणि आता आई…, वाचा राखीच्या कुटुंबियांविषयी

हे देखील वाचा