Friday, July 5, 2024

नितेश पांडे यांच्या निधनाने हादरलेली रुपाली गांगुली, कारमध्ये बसताच ढसाढसा रडली अभिनेत्री

अनुपमा‘ फेम अभिनेता नितेश पांडे यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अशात ‘अनुपमा’स्टार रुपाली गांगुलीही खूप भावुक झाली आहे. इतकेच नव्हे तर, अशा स्थितीत अभिनेत्री गाडीत तोंडावर स्कार्फ बांधून रडताना दिसली, ज्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल असून चाहतेही फार इमाेशलन झाले आहेत.

खरे तर, एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रुपाली गांगुली (rupali ganguly) खूप भावूक झाली असून अभिनेत्रीची प्रकृती अजिबात चांगली दिसत नाही. व्हिडिओमध्ये रुपाली नितेशच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहे. यानंतर, ती तिच्या कारमध्ये बसते आणि कॅमेऱ्यांपासून तिचा चेहरा लपवत तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यााच प्रयत्न करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saas Bahu Aur Betiyaan (@atsbb)

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रुपाली गाडीत बसताच तिचा चेहरा स्कार्फने झाकते आणि रडते. रुपालीला असे पाहून चाहतेही भावूक होत आहेत. अनुपमा शोचे अभिनेता नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
नितेश यांनी वयाच्या 51व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रूपालीचे नितेशसोबत ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन दोन्हीठिकाणी खूप घट्ट बॉन्डिंग होते. ते दोघे खूप जवळचे मित्र होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saas Bahu Aur Betiyaan (@atsbb)

माध्यमातील वृत्तानुसार, नितेश पांडे इगतपुरी येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. अशात अभिनेत्याने संध्याकाळी त्यांच्या खोलीत जेवणाची ऑर्डर दिली होती. जेवण पोहोचवायचे असताना अभिनेत्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावण्यात आला. मात्र, अभिनेत्याने आतून दरवाजा उघडला नाही. अशा स्थितीत मास्टर चावीच्या साहाय्याने नितेशच्या खोलीचा दरवाजा उघडला. यानंतर नितेश पांडे त्यांच्यासमोर बेशुद्धावस्थेत पडलेला आढळून आले.( tv actress rupali ganguly in shock to get news of co actor nitesh pandey sudden demise actress could not hide her emotions )

हे देखील वाचा